Mental Health At Workplace : ऑफिसमधील वातावरणामुळे मानसिक आरोग्यावर होतो 'हा' परिणाम; जाणून घ्या कारणं

Mental Health : मानसिक आरोग्य ही एक मोठी आणि महत्त्वाची समस्या आहे.
Mental Health At Workplace
Mental Health At Workplace Saam Tv
Published On

Office Stress : मानसिक आरोग्य ही एक मोठी आणि महत्त्वाची समस्या आहे. परंतु या विषयाकडे लक्ष देणारे लोक खूप कमी आहेत. डब्ल्यूएचओने मानसिक आरोग्याला गंभीर समस्या म्हणूनही सांगितले आहे. अशातच ,कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक त्रासाने त्रस्त असलेल्यांची संख्या जास्त आहे.

डब्ल्यूएचओनुसार, जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या काम करते. 15% प्रौढ लोक मानसिक त्रास सहन करत आहेत. वेळेत योग्य उपचार आणि मदत न मिळाल्यास मानसिक विकारामुळे त्रास होऊ शकतो. यामुळे त्यांच्या कामावर परिणाम तर होतोच,त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास आणि काम करण्याची क्षमताही कमी होते.

खराब मानसिक आरोग्यामुळे (Health) कुटुंबावर, सहकाऱ्यांवर, समाजावर आणि एखाद्याच्या करिअरवर मोठा नकारात्मक परिणाम होतो. डब्ल्यूएचओच्या मते, निराशा आणि चिंतेमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला खूप नुकसान होते. त्यामुळे उत्पादकता कमी होते. मानसिक आरोग्यावर केवळ भावनिक किंवा वैयक्तिक जीवनाचा परिणाम होत नाही, तर कामाच्या जीवनामुळेही होऊ शकतो याकडे लोकांनी लक्ष द्यायला हवे.असे निदर्शणास आले आहे.

एका रिपोर्टनुसार,गेल्या 1-2 वर्षांत, कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या समस्यांची वाढत आहेत. यापूर्वीही लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक समस्या होत्या परंतु लॉकडाउननंतर यांची संख्या खूप वाढली आहे.

Mental Health At Workplace
Post Office Saving Schemes : पोस्टात रोज फक्त 170 रुपये गुंतवून व्हा मालामाल, 5 वर्षात मिळतील एवढे पेसै

चिंता, नैराश्य आणि तणाव हे कामाच्या ठिकाणच्या समस्या आहेत. ज्या ठिकाणी कर्मचार्‍यांच्या मेहनतीचे कौतुक केले जात नाही, त्यांच्या कामाची पोचपावती नाही.त्या ठिकाणी मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. याशिवाय एका व्यक्तीशी दुसऱ्या व्यक्तीशी भेदभाव करणे हे देखील मानसिक समस्याचे प्रमुख कारण आहे.

वर्क फ्रॉम होम आणि ऑफिसमधील कामात बॅलेंस कसा ठेवायचा ?

लॉकडाऊन दरम्यान, वर्क फ्रॉम होम मुळे काहींना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे प्रवासाचा (Travel) वेळ वाचला आणि लोक मोकळेपणाने काम करू लागले. परंतु आता घरून काम करण्याची सोय हळूहळू बंद करण्यात येत आहे. लोकांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाण्यास सांगितले आहे. बॉस, सहकारी आणि कामाच्या ठिकाणी स्वत: ला जुळवून घेण्याच्या समस्या देखील आता समोर येत आहेत.

Mental Health At Workplace
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज जमा करा 50 रुपये, एकदाच मिळवा 35 लाख

मंदी आणि नोकरी गमावण्याची भीती

मंदी आणि नोकरी गमावण्याची भीती हे बीपीचे कारण होऊ शकते. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यात लोक कामावर गेल्यावर दुसऱ्या दिवशी नोकरी जाण्याच्या भीतीने रात्री झोपत नाहीत. त्याचबरोबर काही लोकांना श्वसनाचा तक्रारीही समोर आल्या आहेत. ऑफिसमधून येणारे फोन, इमेल किंवा मेसेज बघायलाही घाबरत असल्याचेही लक्षात आले आहे. त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा मेसेज आला का? अशी भीती त्यांच्या मनात असते.

कामाच्या ठिकाणी बॅंलेस कसा ठेवायचा ?

  • आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे लोक घर (Home) आणि काम (Work) या दोन्ही ठिकाणी बॅंलेस ठेवण्याला प्राधान्य देतात.त्यासाठी अनेक उपाय करुन गोष्टी सोप्या करतात.

  • जेव्हा शक्य असेल तेव्हा कामाचे ताण आणि मोकळा वेळ याबाबत योग्य ते नियोजन करायला हवे. स्वतः च्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हवे.

  • कामाच्या ठिकाणी सर्वांसाठी मानसिक तणाव हलका करण्यासाठी मानसशास्त्रीय केंद्रे असावीत.जेणेकरुन लोक नियमितपणे मानसशाश्त्रांना भेटू शकतील.

  • जेव्हा लोक तणावपूर्ण वातावरणात काम करतात तेव्हा त्यांची काम करण्याची इच्छा आणि मानसिक आरोग्य दोन्ही चांगल्या नसतात. म्हणूनच कर्मचारी आणि बॉस यांच्यात नियमित बैठका झाल्या पाहिजेत, जेणेकरून ते त्यांचे मत थेट मांडू शकतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com