Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! रोज जमा करा 50 रुपये, एकदाच मिळवा 35 लाख

Post Office Investment Schemes : पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक (post office deposit plan) करुन चांगला नफा मिळवू शकता.
Post Office Investment Schemes
Post Office Investment SchemesSaam TV
Published On

Post Office Latest Scheme: पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) गुंतवणूक करण्यात ग्राहकांचा कल जास्त असतो कारण पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवणे हे जोखीममुक्त मानले जाते. पोस्ट ऑफिसकडून ग्राहकांसाठी अनेक विशेष योजना चालवल्या जातात. ज्यामध्ये ग्राहकांना लाखोंचा फायदा होतो. तुम्ही देखील पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक (post office deposit plan) करुन चांगला नफा मिळवू शकता.

Post Office Investment Schemes
Honda Elevate Suv : होंडाची मिड साइज Elevate SUV लॉन्च ! जाणून घ्या किमत व फीचर्स

पोस्ट ऑफिसच्या अनेक बचत योजना आहेत. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर सरकारकडून तुम्हाला चांगला परतावा दिला जातो. त्यामुळे ग्राहक देखील विश्वासाने आणि मनामध्ये कोणतीही शंका न आणता पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करतात. पोस्ट ऑफिसने नुकताच एक योजना सुरु केली आहे. ग्राम सुरक्षा योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून तुम्ही चांगला परतावान मिळवू शकता. या योजनेत पैसे गु्ंतवल्यामुळे तुम्हाला सरकारकडून पूर्ण 35 लाख रुपये मिळतील.

Post Office Investment Schemes
Tattoo Trend: टॅटू काढताय तर सावधान..आयुष्यभरासाठी टॅटू पडू शकतो महागात; सुईमुळे एचआयव्हीचा धोका?

ग्राम सुरक्षा योजना -

पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव ग्राम सुरक्षा योजना असे आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला सरकारकडून पूर्ण 35 लाख रुपये मिळतात. ही योजना भारतीय पोस्ट ऑफिसने ग्राहकांसाठी सुरू केली आहे. ही संरक्षण योजना असाच एक पर्याय आहे ज्यामध्ये तुम्हाला कमी जोखमीसह चांगला परतावा मिळू शकतो. या योजनेत तुम्हाला दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच या योजनेसाठी तुम्ही दररोज फक्त 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा परतावा मिळवू शकतो.

Post Office Investment Schemes
What Is Beige Flag: बेज फ्लॅग म्हणजे काय? या व्हायरल डेटिंग ट्रेन्डची का होतेय एवढी चर्चा

31 लाख ते 35 लाख रुपयांचा फायदा -

जर तुम्ही या योजनेत नियमितपणे गुंतवणूक केली तर येत्या काळात तुम्हाला 31 लाख ते 35 लाख रुपयांचा फायदा मिळेल. पोस्ट ऑफिसची ही योजना भारतातील सर्व पोस्ट ऑफिसांमध्ये उपलब्ध आहे. ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या 8200 शाखांमध्ये तसेच भारतातील प्रत्येक शहरातील पोस्ट ऑफिस मध्ये चालवली जाते. ग्राम सुरक्षा योजना ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना कार्यक्रमाचाच एक भाग आहे.

Post Office Investment Schemes
Jio Recharge Plan : रिचार्ज करण्याची झंझट नकोच ! ७ रुपयात Jio चा स्वस्तात मस्त रिचार्ज, मिळणार अनलिमिटेड कॉलिंगसह 5GB डेटाही फ्री...

असा मिळेल परतावा -

या योजनेचा फायदा कसा मिळतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची योजना त्यांनी घेतली. तर त्यांनी 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.

Post Office Investment Schemes
Gold Silver Price : लग्नसराईत धक्का ! सोन्याच्या दरात वाढ तर चांदी ७२ हजार पार, तपासा आजचे दर

या योजनेत अशी करा गुंतवणूक -

- 19 ते 55 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.

- या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपये असू शकते.

- या प्लानचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते.

- तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.

- या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता.

- ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ती सरेंडरही करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com