Chanakya Niti Success Mantra : यशस्वी आणि श्रीमंत व्हायचंय? तर अशा लोकांशी संपवा संबंध, प्रत्येक काम होईल सुरळीत

Success Mantra : जगातील महान अर्थतज्ज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि मार्गदर्शन आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रामध्ये यशस्वी होण्याचे मार्ग सांगितले आहेत. चाणक्य नीती सांगते की एखाद्या व्यक्तीने यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे.
Chanakya Niti Success Mantra
Chanakya Niti Success Mantra Saam Tv
Published On

Chanakya Niti :

जगातील महान अर्थतज्ञ, राजकारणी, मुत्सद्दी आणि मार्गदर्शन आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये यशस्वी होण्याचे मार्ग सांगितले आहेत. चाणक्य नीती सांगते की एखाद्या व्यक्तीने यशस्वी (Successful) होण्यासाठी काय केले पाहिजे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चुकीच्या सवयी (Habits) आणि चुकीच्या माणसांचा सहवास यशाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या व्यक्तीलाही मागे खेचतो आणि यशस्वी होण्यापासून रोखतो. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले.

दुसऱ्यांच्या पापांची शिक्षा भोगावी लागते

चाणक्य नीतीमध्ये, आचार्य चाणक्य यांनी एक श्लोक लिहिला आहे:

'राजा राष्ट्रकृतं पापं राज्ञः पापं पुरोहितः ।

भर्ता च स्त्रीकृतं पापं शिष्यपापं गुरुस्तथा।।'

Chanakya Niti Success Mantra
Chanakya Niti On Marriage : चाणक्यांच्या मते मुलींच्या या गुणांकडे आवर्जून लक्ष द्या, अन्यथा लग्नानंतर येऊ शकतात अडचणी

या श्लोकात चाणक्यांनी काही लोकांबद्दल सांगितले आहे ज्यांना कोणतीही चूक न करता इतरांच्या पापांची शिक्षा भोगावी लागते. हे लोक राजा-प्रजा, गुरु-शिष्य आणि पती-पत्नी असतात. या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य सांगत आहेत की, चुकीची किंवा वाईट कृत्ये करणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतातच पण कधी-कधी इतरांच्या वाईट कर्मांचे परिणामही भोगावे लागतात.

राजा-प्रजा

चाणक्य नीतीनुसार, देशाच्या शासकाने जर काही चुकीचे काम केले तर त्याचे परिणाम संपूर्ण देशातील जनतेला भोगावे लागतात. त्यामुळे राज्यकर्त्याने योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. जर शासक दुष्ट आणि अत्याचारी असेल तर अशा देशाला सोडणे चांगले. त्याचप्रमाणे, कोणत्याही उच्च पदावरील वाईट व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करू नका, तो कधीही तुमचे मोठे नुकसान करू शकतो.

गुरू-शिष्य

गुरूचे काम शिष्याला मार्ग दाखवणे आहे. जर गुरू योग्य नसेल किंवा त्याचे आचरण आणि कृती योग्य नसेल तर अशा गुरूपासून अंतर ठेवणे चांगले. त्यामुळे तुमच्या गुरूची निवड हुशारीने करा.

Chanakya Niti Success Mantra
Chanakya Niti On Money : आयुष्यभर धडपड करूनही अशा लोकांच्या हाती कधीही टिकत नाही पैसा, वाचा सविस्तर

पती-पत्नी

पती-पत्नी एकाच रथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते. पण जर दोघांपैकी एक वाईट असेल, गैरवर्तन करत असेल किंवा फसवणूक करणारा असेल तर दुसऱ्याने त्याच्याशी असलेले नाते संपवले पाहिजे. कारण अशा जीवनसाथीसोबत राहणे म्हणजे नरकासारखे जीवन जगणे होय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com