Bajara Soup Recipe : हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून दूर राहाण्यासाठी फायदेशीर ठरेल बाजरीचे सूप, रेसिपी पाहा

Winter Healthy Recipe : जर तुम्हाला देखील सर्दी-खोकल्यापासून दूर राहायचे असेल तर बाजरी फायदेशीर ठरेल. बाजरीची भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही त्याचे सूप ट्राय करु शकता. जाणून घेऊया रेसिपी
Bajara Soup Recipe
Bajara Soup RecipeSaam tv
Published On

How To Make Healthy Bajara Soup :

हिवाळ्यात गुलाबी थंडीच्या अनुभवासोबत अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. बदलत्या हवामानुसार सर्दी-खोकला होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागते.

हिवाळ्यात मिळणारे विविध पदार्थ आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. रोगप्रतिकारशक्ती चांगली राहाण्यासाठी अनेक हेल्दी पदार्थांचे (Food) सेवन केले जाते. त्यासाठी हंगामी फळे आणि भाज्यांवर अधिक भर दिला जातो. जर तुम्हाला देखील सर्दी-खोकल्यापासून दूर राहायचे असेल तर बाजरी फायदेशीर ठरेल. बाजरीची भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही त्याचे सूप ट्राय करु शकता. जाणून घेऊया रेसिपी (Recipes). ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • बाजरीचे पीठ - ३ चमचे

  • तेल (Oil) - २ चमचे

  • चिरलेला गाजर –१/४ वाटी

  • चिरलेले बीन्स – १/४ वाटी

  • पालक बारीक चिरून – १/४ वाटी

  • चिरलेला टोमॅटो – १/४ वाटी

  • मीठ - चवीनुसार

  • काळी मिरी - चवीनुसार

  • किसलेले चीज - 1 टीस्पून

Bajara Soup Recipe
Jowar Upma Recipe : वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल ज्वारीचा उपमा, पचनही सुधारेल; थंडीच्या दिवसात चव चाखाच

2. कृती

  • सर्व प्रथम एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात बाजरीचे पीठ थोडे थोडे घालून चांगले मिक्स करावे.

  • आता गॅसच्या दुसऱ्या बाजूला एका पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात चिरलेला गाजर आणि बीन्स घालून तळून घ्या आणि पॅन झाकून ठेवा.

  • 2 ते 3 मिनिटांनंतर बारीक चिरलेला पालक आणि टोमॅटो आणि मीठ घालून मिक्स करावे.

  • चमच्याने टोमॅटो चांगले मॅश करा आणि मध्यम ते मंद आचेवर २ ते ३ मिनिटे शिजू द्या.

  • सूप बनवण्यासाठी शिजवलेल्या भाज्यांमध्ये तयार केलेले बाजरीचे मिश्रण घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.

  • सूपमध्ये काळी मिरी पावडर आणि चीज घाला.

  • गरमागरम सर्व्ह करा बाजरीचे हेल्दी सूप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com