Dark knuckles: कोपर आणि गुडघे काळे पडलेत? याचं कारण फक्त घाण नाही; ‘या’ गंभीर समस्या असू शकतात

Causes of dark knuckles: बोटांचे सांधे, कोपर आणि गुडघे काळे पडण्यामागे घर्षण, कोरडी त्वचा, इन्सुलिन रेजिस्टन्स, व्हिटॅमिन B12 कमतरता किंवा इतर आरोग्य समस्या असू शकतात. अचानक काळेपणा वाढल्यास कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या करणे महत्त्वाचे ठरते.
Dark knuckles
Dark knucklessaam tv
Published On

चेहरा चांगला दिसावा यासाठी आपण अनेकदा वेगवेगळे उपाय करतो. मात्र हातांच्या बोटांचे सांधे, कोपर आणि गुडघे यांसारख्या शरीराच्या काही भागांकडे मात्र दुर्लक्ष होतं. या ठिकाणी हळूहळू काळेपणा वाढू लागला की त्वचेचा रंग असमान दिसतो आणि त्याचा परिणाम एकूण लूकवरही होतो.

अनेकांना अशा वेळी हा काळेपणा घाण किंवा त्वचेची योग्य स्वच्छता न केल्यामुळे झालाय असं वाटतं. मात्र प्रत्येक वेळी त्यामागे हेच कारण असेल असं नाही. त्वचेवर सतत होणारे घर्षण, दाब यासोबतच शरीरातील काही बदलांमुळेही बोटांचे सांधे, कोपर आणि गुडघ्यांचा रंग गडद होऊ शकतो.

Dark knuckles
High cholesterol: ही ६ ड्रिंक्स रक्तवाहिन्यांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल खेचून काढतील बाहेर

बोटांचे सांधे, कोपर आणि गुडघे काळे का पडतात?

त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत बोटांचे सांधे, कोपर आणि गुडघ्यांवरील त्वचा थोडी जाड असते. या भागांवर सतत दाब किंवा घर्षण होत राहिल्यास त्वचेच्या वरच्या थरात केराटिन नावाच्या प्रोटीनचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे या भागांची त्वचा अधिक जाड आणि काळसर दिसू लागते.

याशिवाय एखाद्या भागावर वारंवार घर्षण होत असेल किंवा सतत दाब पडत असेल तर शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा एक्टिव्ह होऊ शकते. अशावेळी त्या भागात मेलेनिनचं उत्पादन वाढू शकतं. मेलेनिन हे त्वचेचा रंग ठरवणारं नैसर्गिक रंगद्रव्य आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी वारंवार घर्षण, दाब किंवा किरकोळ इजा होत राहिल्यास तिथली त्वचा इतर भागांच्या तुलनेत अधिक गडद दिसू शकते.

अचानक काळेपणा वाढला तर दुर्लक्ष करू नका

मात्र बोटांचे सांधे, कोपर किंवा गुडघ्यांचा काळेपणा अचानक वाढत असेल तर त्याकडे केवळ सौंदर्याशी संबंधित समस्या म्हणून पाहणं योग्य नाही. काही वेळा त्वचेतील असे बदल शरीरातील इतर समस्यांकडेही संकेत देऊ शकतात.

यापैकी एक कारण म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स. या स्थितीत शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. परिणामी रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढू शकते. वाढलेल्या इन्सुलिनचा परिणाम त्वचेतील पेशींवरही होऊ शकतो आणि काही भागांची त्वचा अधिक काळसर दिसू शकते.

Dark knuckles
High cholesterol: रात्रीचं जेवण बंद केल्याने रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांचं उत्तर ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

व्हिटॅमिन B12 ची कमतरता

काही लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यास त्वचेचा रंग गडद होण्याचे बदल दिसू शकतात. विशेषतः हातांच्या बोटांच्या सांध्यांवर म्हणजेच नकल्सवर जास्त काळेपणा दिसत असेल तर शरीरात पोषणाची कमतरता आहे का याचाही विचार करणं गरजेचं आहे. म्हणूनच केवळ बाहेरून क्रीम किंवा घरगुती उपाय करण्यापेक्षा गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तपासणी करून घेणं महत्त्वाचं ठरतं.

थायरॉइड आणि एडिसन डिसीज

त्वचेचा रंग बदलण्यामागे थायरॉइडची समस्या हे देखील एक कारण असू शकते. याशिवाय एडिसन डिसीजसारख्या काही आरोग्य समस्यांमध्येही त्वचेवर काळसरपणा किंवा इतर रंगबदल दिसू शकतात. जर बोटांचे सांधे, कोपर किंवा गुडघ्यांवरील काळेपणा बराच काळ कायम असेल, सतत वाढत असेल किंवा त्यासोबत अशक्तपणा, वजन कमी होणं किंवा वाढणं यांसारखी इतर लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

काळेपणा कमी करण्यासाठी काय करावं?

जर काळेपणा त्वचेचा कोरडेपणा, डेड स्किन किंवा सततच्या घर्षणामुळे वाढला असेल तर त्वचेची योग्य काळजी घेणं उपयोगी ठरू शकतं. त्वचा स्वच्छ ठेवणं, तिच्यातील ओलावा टिकवून ठेवणं आणि जास्त कोरडेपणा होऊ न देणं महत्त्वाचं आहे.

दही आणि हळदीचा लेप

दही आणि हळद यांचं मिश्रण त्वचेवरील काळसरपणा कमी करण्यासाठी अनेकजण वापरतात. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यास मदत करू शकते. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा घटक असतो. त्यामध्ये दाह कमी करण्याचे आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.

Dark knuckles
High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

बटाटा आणि लिंबू

त्वचेचा काळेपणा कमी करण्यासाठी बटाटा आणि लिंबाचा वापरही अनेक घरगुती उपायांमध्ये केला जातो. बटाट्यामध्ये असलेले काही एन्झाइम त्वचेचा रंग एकसारखा दिसण्यास मदत करू शकतात. लिंबामध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे त्वचेवरील मृत पेशी दूर करण्यास मदत करू शकते.

बदाम आणि मलाईचा लेप

बदाम आणि मलाई यांचं मिश्रणही त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. बदामामध्ये व्हिटॅमिन E असतं, जे त्वचेला पोषण देण्यास मदत करतं. तर मलाई त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करू शकते.

Dark knuckles
High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com