Tea Strainer Cleaning: चहाच्या गाळणीवर जमा झालेला काळाकुट्ट थर जमा झालाय? घरच्या घरी हे 5 सोपे उपाय वापरून तर बघा

How to Clean Tea Strainer: चहाची गाळणी काळी पडली आहे का? तिच्या बारीक छिद्रांमध्ये अडकलेली घाण आणि चहाचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगर, लिंबाचा रस, गरम पाणी आणि डिशवॉशिंग लिक्विडचा वापर कसा करावा, जाणून घ्या सोपे घरगुती उपाय.
Tea Strainer Cleaning
Tea Strainer Cleaningsaam tv
Published On: 

चहा हा अनेकांच्या दिवसाची सुरुवात करण्याचा आवडता प्रकार आहे. सकाळी गरमागरम चहा असो किंवा संध्याकाळचा चहाचा कप, चहा प्यायल्याने थकवा दूर होतो आणि मूडही चांगला होतो. भारतीय घरांमध्ये चहा बनवण्यासाठी चहाची पावडर, दूध, साखर यांसोबत चहाची गाळणीही महत्त्वाची असते. पण रोज वापरली जाणारी ही गाळणी अनेकदा व्यवस्थित स्वच्छ केली जात नाही. त्यामुळे तिच्या बारीक छिद्रांमध्ये चहाची पावडर अडकून राहते आणि हळूहळू काळा किंवा तपकिरी थर जमा होतो.

चहा बनवल्यानंतर गाळणी पाण्याने धुतली जाते. पण त्यातील चहाचे बारीक कण पूर्णपणे निघत नाहीत. काही दिवसांनी हे कण गाळणीच्या छिद्रांमध्ये साचतात. त्यामुळे गाळणी काळी पडू लागते आणि तिची छिद्रंही बंद होतात. अशा गाळणीने चहा गाळताना अडचण येते. पण घरातील काही साध्या वस्तू वापरून ही गाळणी पुन्हा स्वच्छ करता येऊ शकते.

Tea Strainer Cleaning
Bathroom ceiling paint: बाथरूमच्या छतावरील पेंट सतत उखडतोय? या साध्या आणि सोप्या टीप्सने करू शकता दुरूस्त

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

चहाच्या गाळणीवर साचलेला जुना काळा थर काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि पांढऱ्या व्हिनेगरचा वापर तुम्ही करू शकता. एका मोठ्या भांड्यात बेकिंग सोडा आणि व्हिनेगर समान प्रमाणात घ्या. हे दोन्ही एकत्र केल्यावर फेस तयार होतो, त्यामुळे भांडं मोठं असणं गरजेचं आहे.

या मिश्रणात चहाची गाळणी टाकून साधारण एक तास भिजत ठेवा. यामुळे गाळणीवर साचलेली घाण आणि चहाचे कण सैल होण्यास मदत होते. त्यानंतर गाळणी बाहेर काढून मऊ ब्रशने हलक्या हाताने घासून घ्या. ज्या ठिकाणी काळा थर जास्त जमा झाला आहे, त्या भागांवर विशेष लक्ष द्या.

गरम पाण्याने करा स्वच्छ

गाळणीवर फारशी घाण जमा झाली नसेल तर गरम पाण्यानेही ती स्वच्छ करता येते. गाळणी गरम पाण्याखाली धरा किंवा तिच्यावर उकळलेलं पाणी ओता. गरम पाण्यामुळे गाळणीमध्ये अडकलेले चहाचे कण आणि घाण सैल होण्यास मदत होते.

त्यानंतर छोट्या ब्रशने गाळणी घासून घ्या. तिच्या बारीक छिद्रांमध्ये अडकलेली चहाची पावडर सहज बाहेर निघू शकते. पण उकळत्या पाण्याचा वापर करताना काळजी घ्या. गरम पाणी हातावर पडणार नाही याची काळजी घ्या.

लिंबाच्या रसाने काढा काळा थर

चहाच्या गाळणीवर जमा झालेला काळा किंवा तपकिरी थर काढण्यासाठी लिंबाचाही उपयोग होऊ शकतो. यासाठी एक लिंबू अर्धं कापून त्याचा रस गाळणीवर लावा. ज्या ठिकाणी काळा थर जास्त जमा झाला आहे, त्या भागांवर लिंबाचा रस व्यवस्थित लावा. काही मिनिटं गाळणी अशीच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुऊन मऊ ब्रशने घासून घ्या. लिंबातील आम्लामुळे जमा झालेली घाण सैल होण्यास मदत होते आणि गाळणी स्वच्छ करता येते.

Tea Strainer Cleaning
Fridge Cleaning Tips: फ्रिजच्या दारातील रबर काळाकुट्ट झालाय? चिंता सोडा, फक्त ही 1 ट्रिक वापरून रबर दिसेल नव्यासारखा चमकदार

डिशवॉशिंग लिक्विड आणि जुना टूथब्रश

गाळणी स्वच्छ करण्यासाठी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या डिशवॉशिंग लिक्विड आणि जुन्या टूथब्रशचाही वापर करता येतो. एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडं डिशवॉशिंग लिक्विड टाका. या पाण्यात गाळणी काही मिनिटं भिजत ठेवा. त्यानंतर जुन्या, पण स्वच्छ टूथब्रशने गाळणी हळूहळू घासून घ्या. टूथब्रशचे बारीक ब्रश गाळणीच्या छोट्या छिद्रांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे त्यात अडकलेली चहाची पावडर आणि इतर घाण काढणं सोपं होतं. शेवटी गाळणी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.

डेंचर क्लीनिंग टॅब्लेट

घरात दातांच्या कवळीची स्वच्छता करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डेंचर क्लीनिंग टॅब्लेट असतील, तर त्यांचाही वापर गाळणी स्वच्छ करण्यासाठी करता येतो. एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात एक टॅब्लेट टाका. आता चहाची गाळणी या पाण्यात 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवा. टॅब्लेटमुळे तयार होणारा फेस आणि स्वच्छतेची प्रक्रिया गाळणीवर जमा झालेले चहाचे अवशेष सैल होण्यास मदत होते.

Tea Strainer Cleaning
Plastic Containers Vastu: किचनमध्ये प्लास्टिकच्या डब्यांचा खच पडलाय? वास्तूशास्त्रात सांगितलेत योग्य नियम

रोजच्या वापरानंतर गाळणी अशी ठेवा स्वच्छ

चहाच्या गाळणीवर जाड काळा थर जमा होऊ नये यासाठी प्रत्येक वापरानंतर ती लगेच स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे. चहाची पावडर गाळणीमध्ये जास्त वेळ तशीच ठेवू नका. वापर झाल्यानंतर पाण्याने गाळणी धुवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.