Plastic Containers Vastu: किचनमध्ये प्लास्टिकच्या डब्यांचा खच पडलाय? वास्तूशास्त्रात सांगितलेत योग्य नियम

Things Not to Keep in Kitchen: वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात काही वस्तू ठेवणे टाळावे, असे मानले जाते. तुटलेली भांडी, झाडू, प्लास्टिकचे डबे, देवघर, आरसा आणि औषधांबाबत कोणते नियम सांगितले आहेत? घरातील सुख-समृद्धीसाठी या वास्तू टिप्स जाणून घ्या.
Plastic Containers Vastu
Plastic Containers Vastusaam tv
Published On: 

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूला एक ठराविक जागा असते. घरात कोणती वस्तू कुठे ठेवावी, याचे काही नियम वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेले आहेत. असं मानलं जातं की, घरातील वस्तू योग्य जागी ठेवल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं. त्याचप्रमाणे सुख-समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. यामध्ये घरातील स्वयंपाकघराला विशेष महत्त्व आहे. कारण स्वयंपाकघरात लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा वास असतो, असं मानलं जातं.

ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, स्वयंपाकघराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कोणत्या गोष्टी ठेवल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी ठेऊ नये याकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वयंपाकघरात काही वस्तू ठेवल्याने घरात आर्थिक अडचणी, पैशांची चणचण आणि कुटुंबात वाद होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रात मानण्यात आलं आहे. त्यामुळे किचनमध्ये कोणत्या गोष्टी ठेऊ नयेत हे जाणून घेऊयात.

तुटलेली भांडी

वास्तूशास्त्रानुसार, घरामध्ये कधीही तुटलेली भांडी ठेऊ नयेत. याचं कारण म्हणजे तुटलेल्या भांड्यामध्ये जेवणं करणं अशुभ मानण्यात येतं. अशा भांड्यांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील शांतता बिघडू शकते, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे तुटलेली भांडी वेळीच घरातून काढून टाकावीत.

Plastic Containers Vastu
Kitchen Vastu Tips: किचनमध्ये फ्रिजच्या समोर आरसा लावावा का? जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं

झाडू

काही लोकांच्या घरात झाडू हा स्वयंपाक घरात ठेवलेला असतो. मात्र वास्तूशास्त्र सांगतं की, तुमच्या घरात झाडू ही योग्य ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. चुकीच्या ठिकाणी झाडू ठेवल्याने कामांमध्ये अडथळे येऊ शकतात आणि घरात पैशांची चणचण भासू शकते. शास्त्र सांगतं की, तुमची झाडू नेहमी घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला असलेल्या कोपऱ्यात आणि नजरेस पडणार नाही अशा ठिकाणी ठेवावा.

प्लास्टिकचे डबे

स्वयंपाकघरात प्लास्टिकचे डबे ठेवणं टाळलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार, प्लास्टिकमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्लास्टिकच्या डब्यांऐवजी स्टील, काचेचे, सिरॅमिक डबा वापरावा. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक उर्जा वाढत नाही.

देवघर

काही घरांमध्ये तुम्ही देवघर हे किचनमध्ये ठेवलेलं पाहिलं असेल. मात्र वास्तुशास्त्रानुसार, कधीही स्वयंपाकघरात देवघर ठेऊ नये. याच कारण म्हणजे, स्वयंपाक करताना अनेक वस्तू इकडे-तिकडे ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे अनेकदा खरकटी भांडीही तिथे असतात. अशा ठिकाणी देवघर ठेवल्याने देवघराचं आणि त्यातील मूर्तींचं पावित्र्य राखलं जात नाही, असं मानलं जातं. त्यामुळे देवघरासाठी घरात वेगळी आणि स्वच्छ जागा असावी.

Plastic Containers Vastu
Kitchen Vastu Tips: किचनमध्ये मसाल्यांचे डबे कोणत्या दिशेला ठेवावेत? वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत योग्य नियम

आरसा

स्वयंपाकघरात आरसा लावणं हे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानलं जात नाही. आरसा लावल्याने स्वयंपाकघरातील ऊर्जेचं संतुलन बिघडू शकते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, किचनमध्ये आरसा असेल तर नकारात्मकता वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे स्वयंपाकघरात आरसा लावण्याचा विचार करत असाल, तर आधी वास्तुशास्त्राच्या जाणकारांचा सल्ला घ्यावा.

औषधं

काही व्यक्तींच्या किचनमध्येही औषधं असतात. मात्र वास्तूशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात औषधं ठेवणं टाळलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार, औषधांमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे घरातील वातावरणावर त्याचा वाईट परिणाम होतो, असं मानलं जातं. औषधं नेहमी वेगळ्या, स्वच्छ आणि शांत ठिकाणी ठेवावीत.

Plastic Containers Vastu
Washing Machine Vastu: घरात वॉशिंग मशीन कुठे ठेवताय? योग्य दिशा माहिती नाही? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.