केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

केस गळणे आणि केसांची मंद झालेली वाढ या समस्येने त्रस्त आहात? भोपळा, जवस (अलसी), सूर्यफूल, तीळ आणि चिया सीड्स यांसारख्या पोषक बीजांचा आहारात समावेश करा. हे बी खाल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
These 5 superseeds will provide a new lease of life to your hair roots
These 5 superseeds will provide a new lease of life to your hair rootssaam tv
Published On: 

आजकाल केस गळणे, पातळ होणे आणि त्यांची वाढ खुंटणे ही अनेकांची मोठी समस्या बनली आहे. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोणी महागडे 'हेयर सिरम' खरेदी करते, तर कोणी केस लांब आणि दाट करण्यासाठी विविध घरगुती उपाय करते. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की केसांच्या आरोग्याचा संबंध केवळ बाहेरून लावल्या जाणाऱ्या तेलाशी किंवा शॅम्पूशी नसून तुमच्या आहाराशीही असतो? शरीराला योग्य पोषण न मिळाल्यास केस कमकुवत होतात आणि तुटण्याची समस्या वाढते.

अशा वेळी तुमच्या रोजच्या आहारात काही आरोग्यदायी बीजांचा समावेश करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. जे शरीर आणि केसांचे आरोग्य राखण्यास मदत करतात. विशेष म्हणजे, हे खाण्यासाठी कोणतीही वेगळी रेसिपी बनवण्याची गरज नाही. तुम्ही यांची पावडर तयार करून दही, सॅलड किंवा स्मूदीमध्ये मिसळून सहज खाऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया अशा ५ बीजांबद्दल आणि ते खाण्याची सोपी पद्धत.

जवस

जवसाच्या छोट्या-छोट्या बिया पोषणाच्या बाबतीत अत्यंत फायदेशीर मानल्या जातात. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर आणि प्रोटीन यांसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. हे घटक शरीराला आवश्यक पोषण देण्यासोबतच एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

These 5 superseeds will provide a new lease of life to your hair roots
9 Flavours Of Panipuri: 9 प्रकारची पाणीपुरी तुम्ही कधी खाल्ली आहे का?

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बिया फक्त स्नॅक्स म्हणून खाण्यासाठीच नव्हे, तर पोषणाच्या दृष्टीनेही खूप चांगल्या असतात. यामध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स असतात. व्हिटॅमिन ई शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करते.

तीळ

तिळाचा वापर तुम्ही लाडू, चिक्की किंवा इतर अनेक पदार्थांमध्ये नक्कीच केला असेल. पण हे छोटे तीळ पोषक घटकांचा मोठा स्त्रोत आहेत. यामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक आढळतात.

These 5 superseeds will provide a new lease of life to your hair roots
Maharashtra : महाराष्ट्राच्या जवळच लपली आहेत 'ही' ४ सुंदर पर्यटन स्थळे; फिरा, खा अन् मनसोक्त एन्जॉय करा!

चिया सीड्स

चिया सीड्स अलीकडच्या काळात अतिशय लोकप्रिय झाले आहेत. आकाराने छोटे असणारे हे चिया सीड्स ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. हे शरीराला पोषण देण्यासोबतच केस मजबूत ठेवण्यास मदत करतात.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बिया दिसायला छोट्या असल्या तरी त्या पोषणाचा खजिना आहेत. यामध्ये झिंक (Zinc), मॅग्नेशियम, आयर्न (लोह) आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळते. झिंक हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे खनिज मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com