Shreya Maskar
महाराष्ट्राच्या जवळच अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत, जिथे निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वास्तू, समुद्रकिनारे आणि चविष्ट खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो.
अध्यात्म, निसर्ग आणि साहसी पर्यटनाचा संगम अनुभवण्यासाठी ऋषिकेश उत्तम ठिकाण आहे. गंगा नदीच्या काठावर वेळ घालवणे, गंगा आरती पाहणे, योग आणि ध्यानाचा अनुभव घेणे यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. रिव्हर राफ्टिंगचाही येथे आनंद घेता येतो.
डोंगररांगा, धुक्याने वेढलेले रस्ते, सुंदर व्ह्यू पॉइंट्स आणि कॅफे यांमुळे मसुरीला 'क्वीन ऑफ हिल्स' म्हटले जाते. हनिमूनसाठी हे लोकेशन खूपच बेस्ट आहे. मॉल रोड, केम्प्टी फॉल्स आणि लँडोर परिसर ही प्रमुख आकर्षणे आहेत.
जयपूरला गेल्यावर ऐतिहासिक वास्तू, राजेशाही महाल, रंगीबेरंगी बाजारपेठा आणि राजस्थानी खाद्यसंस्कृतीचा येथे अनुभव घेता येतो. हवा महल, आमेर किल्ला, सिटी पॅलेस आणि जौहरी बाजार ही प्रमुख आकर्षणे आहेत.
जगप्रसिद्ध ताजमहाल पाहण्यासाठी आग्रा येथे नक्की जा. तसेच येथे ऐतिहासिक आग्रा किल्ला देखील आहे.
तलाव, हिरवेगार डोंगर आणि थंड हवामानामुळे नैनिताल पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तलावात बोटिंगचा आनंद घेता येतो. नैनी तलाव, स्नो व्ह्यू पॉइंट आणि मॉल रोड ही प्रमुख आकर्षणे आहेत.
हम्पी हे ठिकाण ऐतिहासिक मंदिरे, प्राचीन पर्यटन स्थळे आणि अनोख्या दगडी रचनांसाठी प्रसिद्ध आहे. फोटोग्राफीचा येथे भन्नाट आनंद घेता येतो.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.