Pune : पांढरी वाळू, निळेशार पाणी अन् नारळ-सुरूची झाडं, पुण्याजवळ लपलाय 'हा' सुंदर समुद्रकिनारा

Shreya Maskar

पुणे

पुण्यात समुद्रकिनारे नसले तर आजूबाजूला समुद्रकिनाऱ्यांचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. पुणेकरांनो, सुट्टीत जवळच असलेल्या काशिद बीचला भेट द्या.

Pune | google

काशिद बीच

काशिद बीच महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, मुरुडजवळील काशिद गावात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. पुणे आणि मुंबई येथून वीकेंडला फिरायला जाण्यासाठी हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

Kashid Beach | google

कशासाठी प्रसिद्ध?

काशिद बीच पांढरी-सोनेरी वाळू, निळेशार समुद्र आणि लांबच लांब पसरलेल्या किनारा येथे आहे. हिरवीगार झाडे आणि डोंगररांगांच्या निसर्गरम्य दृश्य पाहून तुमचे भान हरपेल.

Famous for what? | google

फोटोशूट

काशिद बीचला सूर्यास्ताच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करता येते. तसेच येथे गेल्यावर कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येतो.

photoshoot | google

पुण्याहून कसे जाल?

पुण्यापासून काशिद बीचचे अंतर साधारण १७० ते १८० किलोमीटर आहे. रस्त्याने प्रवास करण्यासाठी साधारण ४ ते ५ तास लागतात.

How to go from Pune? | google

मुंबईहून कसे जाल?

मुंबईहून काशिद बीचला जाण्यासाठी स्वतःची कार, टॅक्सी, बसने अलिबाग-मुरुडच्या दिशेने प्रवास करता येतो.

How to go from Mumbai? | google

भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ

ऑक्टोबर ते मार्च हा काळ सामान्यतः समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी सोयीचा मानला जातो. पावसाळ्यात परिसर हिरवागार दिसतो.

Best time to visit | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : २-३ दिवसांत करा पिंपरी-चिंचवडची सफर, ऑक्टोबरमध्ये ट्रिपसाठी 'ही' ७ ठिकाणे बेस्ट!

Pimpri-Chinchwad | AI PHOTO
येथे क्लिक करा...