Pimpri-Chinchwad : २-३ दिवसांत करा पिंपरी-चिंचवडची सफर, ऑक्टोबरमध्ये ट्रिपसाठी 'ही' ७ ठिकाणे बेस्ट!

Shreya Maskar

पिंपरी-चिंचवड

ऑक्टोबरमध्ये थंडगार ठिकाणी फिरण्याचा प्लान करा. पिंपरी-चिंचवडमध्ये सुंदर पिकनिक स्पॉट्स लपलेले आहेत. फॅमिली ट्रिपसाठी मुंबई-पुण्याजवळील हे बेस्ट लोकेशन आहे.

Picnic Spot | yandex

मुळशी धरण

मुळशी धरण पाहायला गेल्यावर डोंगर, जलाशय आणि निसर्गरम्य दृश्ये पाहायला मिळतील. तुम्ही येथे फोटोग्राफीचा आनंद घेऊ शकता.

Mulshi Dam | pinterest

दुर्गा टेकडी

निगडी येथील दुर्गा टेकडी हे हिरवाईने नटलेले आहे. येथे उन्हाळ्यातही थंड वारे वाहतात. सकाळी किंवा संध्याकाळी निवांत वेळ घालवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे.

Durga Hill | pinterest

कासारसाई धरण

पिंपरी-चिंचवड परिसरातून छोट्या रोड ट्रिपसाठी कासारसाई धरण बेस्ट लोकेशन आहे. धरणाचा विस्तीर्ण जलाशय, आजूबाजूच्या टेकड्या आणि निसर्गरम्य दृश्ये फोटोग्राफीसाठी आकर्षक आहेत.

Kasarasai Dam | pinterest

खडकवासला धरण

तुम्ही जर जवळच वीकेंड प्लान करत असाल तर खडकवासला धरणाला नक्की भेट द्या. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळेल.

Khadakwasla Dam | pinterest

भोसरी तलाव

भोसरी तलाव हे नैसर्गिक जलाशय आहे. येथे लहान मासे आणि बदके पाहायला मिळतात.

Bhosari lake | pinterest

मारुंजी हिल्स

मारुंजी हिल्सला 'मारुंजी टेकडी' किंवा 'सुल्की नेरे' असेही म्हणतात. महाराष्ट्रातील हिंजवडी आयटी हबजवळ असलेले एक लोकप्रिय स्थानिक डोंगर आणि ट्रेकिंगसाठी ऑफबीट ठिकाण आहे.

Marunji Hills | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : नवरात्री स्पेशल! मुंबईतील ७ प्रसिद्ध देवीची मंदिरं, दर्शनासाठी होते भक्तांची मोठी गर्दी

Mumbai Temple | AI PHOTO
येथे क्लिक करा...