Shreya Maskar
सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह पाहायला मिळत आहे. नवरात्रीत मुंबईतील देवीच्या मंदिरांमध्ये उत्सव पाहायला मिळतो. त्यामुळे येथे दर्शनाला नक्की जा.
भुलेश्वर येथे मुंबादेवीचे सुंदर मंदिर आहे. मुंबईची ग्रामदेवता म्हणून मुंबादेवीला विशेष महत्त्व आहे. शहराचे 'मुंबई' हे नाव देवी मुंबादेवीच्या नावावरून पडल्याचे मानले जाते.
मुंबईतील महालक्ष्मी येथे महालक्ष्मी मंदिर आहे. मंदिरात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवींच्या मूर्ती आहेत. नवरात्रीत येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
विरार पूर्व येथे जगप्रसिद्ध जीवदानी देवी मंदिर आहे. डोंगरावर वसलेले हे प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविक १००० पेक्षा जास्त पायऱ्या चढून जातात.
मालाड पूर्व येथे माँ वैष्णोदेवी दिव्य धाम आहे. वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी ओळखले जाणारे हे मंदिर मुंबईतच देवीभक्तांना धार्मिक वातावरणाचा अनुभव देते.
शीतला देवी मंदिर हे मुंबईतील जुने मंदिर आहे. हे मुंबईत माहिम येथे आहे. या मंदिरात कायम तुम्हाला मंगलमय वातावरण अनुभवता येईल.
विलेपार्ले पूर्व येथील नवपाडा येथे श्री महालक्ष्मी मंदिर आहे. स्थानिक भाविकांसाठी हे श्रद्धेचे ठिकाण असून नवरात्रीत देवीच्या दर्शनासाठी येथे जाता येते.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.