Gudi Padwa 2024 Look: यंदा गुढीपाडव्याला असा करा मराठमोळा साजश्रृगांर, दिसाल एकदम आकर्षक

Gudi Padwa 2024 Maharashtrian Look: चैत्र महिन्याची सुरूवात गुढीपाडवा या सणापासून होते. या दिवशी महिला नटूनथटून शोभा यात्रेला जातात. पारंपारिक पोषाक देखील परिधान करतात. स्त्रिया या सणाला खासकरून मराठमोळा साज करतात. काठपदरी साड्या घालून साजश्रृगांर करतात.
Gudi Padwa 2024 Maharashtrian Look: यंदा गुढीपाडव्याला असा करा मराठमोळा साजश्रृगांर, दिसाल एकदम आकर्षक
Gudi Padwa 2024 Maharashtrian Lookcanva

Gudi Padwa Maharashtrian Traditional Look:

चैत्र मासातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्यापसून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. महाराष्ट्रात वसंत ऋतूचं आगमन आणि गुढीपाडव्याचा सण एकदम थाटामाटात साजरा केला जातो. गुढीपाडव्याला साडेतीन मुहमर्तांपैकी एक देखील मानले जाते. या दिवशी एखादी नवी वस्तू किंवा सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुढीपाडव्यासाठी महिला खास तयारी करतात. त्या महाराष्ट्रीयन पारंपारिक पोषाख परिधान करण्यास पसंती देतात. या लूकला साजेल असे दागिने कोणते हे तुम्हाला माहिती आहेत का? तर जाणून घेऊया परफेक्ट मराठमोळा लुक तुम्हाला कसा मिळेल.

Gudi Padwa 2024 Maharashtrian Look: यंदा गुढीपाडव्याला असा करा मराठमोळा साजश्रृगांर, दिसाल एकदम आकर्षक
Gudi Padwa Traditional Look: गुढीपाडव्याला पारंपारिक नऊवारी नेसाण्याचा विचार करताय? 'या' टिप्स फॉलो करा

मराठमोळ्या लूकला साज देणारा पहिला दागिना म्हणजे चिंचपेटी. माहितीनुसार, चिंचपेटीचा शोध सोळाव्या शतकात लागला होता. चिंचेच्या आकारासार्खी दिसणाऱ्या या पेट्यांची गुंफण मोत्यांमध्ये किंवा हिऱ्यांमध्ये केला जाते. चिंचपेटी हा दागिना ठुशी सारखा दिसतो पण तो पुर्णपणे वेगळा आहे. भरगच्च दागिने घालण्यापेक्षा गळ्यात एकच चिंचपेटी एकदम सोबर दिसते. खणाच्या नऊवारीवर चिंचपेटी एकदम शोभून दिसते. नऊवारीवर गोठ हा बंगड्याचा प्रकार देखील शोभून दिसतो. लग्नापूर्वी कोणत्याही सणाला महिला हातात गोठ घालतात. हिरव्या बांगड्यामध्ये सोनेरी जाड गोठ जास्त शोभून दिसतो.

नऊवारीनेसल्यावर कंबरपट्टा किंवा साखळी घालतात. कंबरपट्टयामुळे साडीचे सौंदर्य अणखी खुलुन दिसते. मंगळसुत्रासार्खा दिसणारा तन्मणी हा मोत्यांचा दागिना आहे. तन्मणीमध्ये रंगीबेरंगी खडे असतात, ज्यामुळे त्याला एक आकर्शक लूक येतो. काठपदराच्या साडीवर तन्मणी अगदी उठून दिसते. या दागिन्यांसोबत कपाळावर छान चंद्रकोर लावायला विसरु नका. मराठमोळा साज चंद्रकोर शिवाय अपुर्ण आहे.

Gudi Padwa 2024 Maharashtrian Look: यंदा गुढीपाडव्याला असा करा मराठमोळा साजश्रृगांर, दिसाल एकदम आकर्षक
Gudi Padwa Food Recipe: गुढीपाडव्या निमित्त सोप्या पद्धतीनं बनवा 'हे' खास पदार्थ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com