ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. त्याचबरोबर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येते.
गुढीपाडव्यासाठी खास नैवेद्य बनवला जातो. गोडाधोडाच्या पदार्थांची मेजवानी घरातील मंडळींना या दिवशी खाण्यासाठी मिळते. काही असे पदार्थ आहे ज्याना तुम्हा घरच्या घरी बनवू शकता.
पुरणपोळी हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक खाद्यपदार्थ आहे ज्याला विविध सणांसाठी घरोघरी केला जातो.
खीर हा झटपट होणारा गोड पदार्थ आहे. त्यामुळे घरी नैवेद्यासाठी बऱ्याचदा खीर बनवली जाते.
गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे श्रीखंड. आजकाल बाजारात फ्लेवर्सचे श्रीखंड मिळतात,पण घरच्या श्रीखंडाची मजा काही निराळीच आहे.
उन्हाळा म्हणजे आंब्यांचा सिजन. तर गुढी पाडव्याच्या निमित्त घरो घरी आमरस देखील बनवला जातो.
बासुंदी हा राजेमहाराज्यांच्या काळात केला जाणारा शाही पदार्थ आहे. त्यामुळे सणासुदीला घरी बनवला जातो