गुगलने नुकतेच Play Store वरुन काही अॅप्सना बंद घातली आहे. प्ले स्टोअर लाखो अॅप्स आहेत यापैकी अनेक अॅप्स वापरण्यास धोकादायक मानले जात आहेत. त्यामुळे गुगल अनेक अॅप्सना बंदी घालते.
Bleeping Computer च्या अहवालानुसार सायबर सुरक्षा कंपनी ESET च्या माहितीनुसार १२ अॅप्समध्ये रिमोट ऍक्सेस ट्रोजन आढळले. याला vauraSPY नाव देण्यात आले आहे. हे अॅप आपल्या फोनमध्ये वैयक्तिक डेटा चोरतो. तसेच युजर्सचे कॉन्टॅक्ट, मेसेज, फाइल्स, डिव्हाइस लोकेशन अॅक्सेस मिळवतात.
या अॅप्सना आजच डिलीट करा
Rafaqat
Privee Talk
MeetMe
Lets's Chat
Quick Chat
Chit Chat
Hello Chat
YahooTalk
TiTalk
Nidus
Glowchat
WaveChat
हे अॅप्स गुगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. जर हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये (phone) असतील तर लगेच डिलीट करुन टाका.
1. अॅप्स इन्स्टॉल करताना या गोष्टी लक्षात ठेवा
अॅप्स इन्स्टॉल करताना त्याच्या परवानग्यांकडे लक्ष द्या. ते कोणत्या परवानग्या मागत आहे हे पाहा.
अॅप्सचा रिव्ह्यू देखील चेक करा. अॅपचा रिव्ह्यू पॉजिटिव्ह असेल तरच डाउनलोड करा.
अॅप्सला किती लोकांनी डाउनलोड केले आहे हे देखील पाहा. तसेच अॅप्सचे डिस्क्रिप्शन देखील तपासा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.