

Marriage Plan Tips : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा भाग असतो. त्यामुळे लग्न करण्याचा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतला पाहिजे. जर हा निर्णय घेण्यास थोडी जरी चूक झाली तर भावी आयुष्यात अनेक परिणामांचा सामना करावा लागतो.
सुखी वैवाहिक जीवन लाभावे म्हणून तुमच्या होणाऱ्या जोडीदारासोबत (Partner) बसून काही गोष्टींवर चर्चा आधीच केलेली चांगले. लग्नानंतर दोघांचीही आयुष्य बदलते त्यामुळे जोडीदाराच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.
एकमेकांच्या मनातील शंका विचारून त्यावर तोडगा काढून दोघांच्या आयुष्यासाठी चांगला निर्णय घ्यावा. अशा वेळेस दोघांच्याही मनातील शंका दूर होतील आणि पुढील येणाऱ्या आयुष्यात सुखी संसाराचा लाभ होईल. तर मग जाणून घेऊया असे कोणते प्रश्न आहेत जे लग्नपूर्वी विचारणे गरजेचे असते.
1. वार्षिक उत्पन्नाविषयी बोला
लग्नानंतर बऱ्याच जोडप्यांना मध्ये घरातील खर्चावरून वादवीवाद होतात जे नात्यात नकारात्मकता निर्माण करू शकते. म्हणून पुढे जाऊन अशा समस्या टाळण्यासाठी आधीच याविषयी बोलणे बरे असेल. होणारा खर्चा आणि बचतीविषयी बोलून घ्या.तुम्ही दोघेही जर नोकरीला (Job) असाल तर घरात होणाऱ्या खर्चाची विभागणी कशी करायची दरम्यान मुलगा आपल्या फायनेंशियल जबाबदारी मुलील सांगू शकतो. लग्नापूर्वी (Wedding) या बद्दल बोलणी करून तुम्ही भविष्यात खर्चावरून होणारे वाद टाळू शकता.
2. लग्नात होणाऱ्या खर्चाबद्दल
सध्या लग्नाबद्दल खूप वेगवेगळे ट्रेंड सुरू आहे त्यामुळे लग्नात होणारा खर्च खूप जास्त वाढतो. लग्नात अनेक कार्यक्रम दोघांच्या कुटुंबाकडून आयोजित केले जातात. त्यामुळे दोघांनी सोबत बसून लग्नात होणारा खर्च किंवा कुठे तुम्हाला पैसे वाचवता येईल याबद्दल प्लॅनिंग करावे. तसेच एकमेकांचा बजेट जाणून लग्नात होणाऱ्या खर्चाची विभागणी करू शकता.
3. लग्नानंतर आई-वडिलांसोबत राहायचे की एकटे?
बऱ्याच वेळा सासू सुनेचे एकमेकांशी पटत नाही यांच्यात भांडणे होतात, त्यामुळे जोडप्यांना एकटे राहण्यास आवडते म्हणून मुलगी मुलाला विचारू शकते की लग्नानंतर ते आई-वडिलांसोबत राहतील की वेगळे राहतील. मुलींना विभक्त कुटुंबात जुळवून घेण्यास थोडा वेळ लागतो परिणामी कुटुंबात भांडणे होऊन नात्यावर नकारात्मक प्रभाव होतो. एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होतो या सर्व समस्या भविष्यात होऊ नये म्हणून होणाऱ्या जोडीदाराबरोर याविषयी आधीच बोलून घेतलेले चांगले.
4. करिअर/ नोकरीबद्दल बोला
लग्नापूर्वी करिअरविषयी बोलणे फार महत्वाचे असते. कारण लग्नानंतर मुलीना नोकरी सोडावी लागते किंवा त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडले जाते. म्हणूनच लग्नापूर्वी मुलगी तिच्या जोडीदाराला विचारू शकते की लग्नानंतर दुसऱ्या शहरात तिला नोकरी मिळेल का? कारण काही वेळा मुली त्यांच्या नोकरीसाठी बदली घेऊ शकत नाहित. आताच्या वाढत्या महागाईत दोघांची कमाई महत्वाची आहे आणि मुलींसाठी नोकरी आत्मसन्मानाशी निगडीत असते, त्यामुळे या विषयावर बोलून लग्नाला होकार दिलात तर तुमच्यासाठी बरं होईल. कारण लग्नानंतर अनेकदा मुलाच्या कुटुंबातील व्यक्ती मुलीवर नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकतात असे दिसून आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.