

Relationhsip Tips : घटस्फोट घेण्यापेक्षा किंवा एकटे राहण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही अनहॅपी मॅरीड लाईफमध्ये राहा. हे आम्ही नाही तर समोरून आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगितले आहे की, लग्न झालेल्या व्यक्तीचे स्वास्थ्य इतर व्यक्तींपेक्षा चांगले असते.
इंग्रजी वेबसाईट डेलीमेलमध्ये छापून आलेल्या बातमीमध्ये या रिसर्च बद्दल सांगितले आहे. शोध घेतल्याप्रमाणे जे लोकं सिंगल आहेत किंवा ज्या लोकांचं लग्न झालेलं नाही आहे त्या लोकांमध्ये ब्लड शुगरची लेवल जास्त वाढू लागते.
खरंतर एक कपल डायटला घेऊन एकमेकांची भरपूर काळजी (Care) घेतात आणि याच कारणामुळे लग्न झालेल्या व्यक्तींचे स्वास्थ्य इतर लोकांपेक्षा चांगले असते.
या आधी समोरून आलेल्या रिसर्चमध्ये सांगितले होते की मॅरीड लाईफचे अनेक हेल्थ बेनिफिट असतात. ज्यामुळे तुम्ही दीर्घायुष्य जगता. कारण की हार्ट अटॅक (Heart Attack), डिप्रेशनची रिस्क कमी होते आणि डेली रुटीनमध्ये तुम्ही हेल्दी अन्न खाता. ही रिसर्च English's longitudinal study of ageing ने केली आहे. ज्यामधे 50 ते 89 वर्षाचे 3300 व्यक्ती सामील आहेत.
शोधकर्त्यांनी लोकांना विचारले की तुमच्या लाईफमध्ये पती-पत्नी आहेत की नाही. 76 टक्के लोकांनी या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी दिले. याशिवाय त्यांना रिलेशनशिपच्या (Relationship) अनुभवाबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
प्रत्येक चार वर्षांमध्ये सगळ्यांचे ब्लड सॅम्पल घेतले आणि आणि त्या लोकांमधील ब्लड शुगर लेवल कशा पद्धतीची आहे हे तपासले. याचा रिझल्ट असा आला की, मॅरीड लाईफमधील व्यक्तींच्या शरीरामध्ये ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये असते.
कार्लटन युनिव्हर्सिटीच्या सायंटिस्ट कॅथरीन फोर्ड म्हणतायेत की, लग्न किंवा रिलेशनशिप दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी इमोशनल अटॅचमेंट असणे अत्यंत गरजेचे असते. एक्सपर्टने सांगितले की, या लोकांचे ब्रेकअप किंवा घटस्फोट झाले आहेत आणि सगळं फेस करून रिलेशनशिपमध्ये पुन्हा आले आहेत अशा लोकांमध्ये देखील ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये असते
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.