Ganesh Chaturthi 2023 Recipe : १० दिवस टिकतील असे खुसखुशीत रव्याचे मोदक; बनतील चविष्ट-टेस्टी, नक्की ट्राय करा

How To Make Rava Modak : तुम्ही देखील चविष्ट आणि टेस्टी काही बनवण्याचा विचार करत असाल तर रव्याचे मोदक ट्राय करुन पाहा.
Ganesh Chaturthi 2023 Recipe
Ganesh Chaturthi 2023 RecipeSaam Tv
Published On

Rava Modak Recipe :

१९ सप्टेंबरला गणपतीचे आगमन घरोघरी होणार आहे. महाराष्ट्रात गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. १० दिवसांच्या उत्सवात गणपतीची विधीवत पूजा व अर्चना केली जाते.

सध्या सगळीकडे खरेदीची लगबग सुरु असेल. तसेच प्रसादात नैवेद्यात लाडू आणि मोदक दाखवला जातो. जर तुम्ही देखील बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही देखील चविष्ट आणि टेस्टी काही बनवण्याचा विचार करत असाल तर रव्याचे मोदक ट्राय करुन पाहा.

Ganesh Chaturthi 2023 Recipe
Ganesh Chaturthi 2023 : गोल अन् मऊ बनतील बुंदीचे लाडू ही सोपी ट्रिक वापरा; पाहा रेसिपी, बाप्पाला आवडेल...

1. साहित्य | Ingredients

  • बारीक रवा १ कप | Fine Semolina 1 cup

  • तूप ४ मोठे चमचे | Ghee 4 tbsp

  • मलाई/दूध १/४ कप | Fresh Cream/Milk ¼ cup

  • पिठी साखर १ कप | Sugar Powder 1 cup

  • वेलची पावडर १/४ चमचा | Cardamom Powder ¼ tsp

2. सारणासाठी | For Stuffing

  • काजू १० ते १२ | Cashew Nuts 10 to 12

  • बदाम १० ते १२ | Almonds 10 to 12

  • पिस्ते १० ते १२ | Pistachios 10 to 12

  • गुळ बारीक चिरून २ मोठे चमचे | Fine Jaggery Powder 2 tbsp

  • वेलची पूड १/४ चमचा | Cardamom Powder ¼ tsp

  • नारळाचा किस २ मोठे चमचे | Desiccated Coconut 2 tbsp

  • केशर | Saffron

3. कृती

  • सर्वप्रथम कढई गरम करुन त्यात तूप घाला त्यानंतर रवा घालून खमंग भाजून घ्या.

  • त्यानंतर त्यात कपभर केसरचे दूध घाला आणि पुन्हा भाजून घ्या

  • भाजल्यानंतर त्यात पीठसाखर घालून परतवून घ्या वरुन वेलची पूड घालून ढवळत राहा.

  • मिश्रण शिऱ्यासारखे झाल्यानंतर वरुन ड्रायफ्रुट्स घाला आणि गॅस बंद करुन प्लेटमध्ये काढून घ्या.

Ganesh Chaturthi 2023 Recipe
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी विशेष! वाहन-प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम योग, शुभ मुहूर्त पाहा
  • तयार मिश्रण प्लेटमध्ये पसरवून थंड होण्यास ठेवा. मिक्सरमध्ये काजू, बदाम, पिस्ता, सुकलेल्या खोबऱ्याचा किस आणि गुळ घालून जाडसर वाटून घ्या

  • वाटलेल्या पावडरचे लहान छोटे गोळे तयार करा. थंड झालेल्या रव्याच्या सारणाला चांगले मळून घ्या.

  • मोदकाच्या सारणात तयार रव्याचे सारण भरुन पाकळी तयार करा, त्यात वरुन मिक्सरमध्ये वाटलेल सारण त्यात भरा.

  • तयार मोदक (Modak) केळीच्या पानात ठेवून बाप्पाला नैवेद्यात प्रसाद म्हणून ठेवा.

Ganesh Chaturthi 2023 Recipe
Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाला नैवेद्यात दाखवा हेल्दी अन् चविष्ट शेंगदाण्याचे मोदक, पाहा रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com