Ganesh Chaturthi 2023 Recipe : २४ तास मऊ राहतील उकडीचे मोदक, कळ्या फुटणारही नाही; पाहा बाप्पा स्पेशल रेसिपी

How To Make Soft Ukdicha Modak : तुम्ही देखील बाप्पासाठी मऊ उकडीचे मोदक बनवण्याचा बेत करत असाल तर या पद्धतीने बनवा कळ्या फुटणार नाही पाहा रेसिपी
Ganesh Chaturthi 2023 Recipe
Ganesh Chaturthi 2023 RecipeSaam Tv
Published On

Ukdiche Modak Recipe :

लाडक्या बाप्पाचे लवकरच घरोघरी आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी कमी दिवस उरले आहे. यंदा १९ सप्टेंबरला बाप्पाचे विराजमान होणार आहेत. बाप्पाचा आवडीचा पदार्थ मोदक. मोदक हा गोड पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे.

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विशेषत: उकडीचे मोदक केले जातात. गणेशोत्सवादरम्यान घराघरातून उकडीच्या मोदकांचा सुगंध दरवळत असतो. मिठाईच्या दुकानांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे मोदक पाहायला मिळतात. अशातच जर तुम्ही देखील बाप्पासाठी मऊ उकडीचे मोदक बनवण्याचा बेत करत असाल तर या पद्धतीने बनवा कळ्या फुटणार नाही पाहा रेसिपी

Ganesh Chaturthi 2023 Recipe
Ganesh Chaturthi 2023 Recipe : १० दिवस टिकतील असे खुसखुशीत रव्याचे मोदक; बनतील चविष्ट-टेस्टी, नक्की ट्राय करा

1. मोदक बनवताना तांदूळ कोणता निवडावा?

  • सुवासिक बासमती रंग थोडा पिवळसर/ थोडे चिरतात

  • इंद्रायणी जुना (उत्तम)

  • आंबे मोहर उत्तम

  • कोलम व नवा तांदूळ (Rice) घेऊ नये.

2. पिठी साठी साहित्य | For making modak Flour -

आंबे मोहर तांदूळ १ किलो | Ambe Mohar Rice 1 Kilo

3. सारण | For Stuffing

  • नारळाचा (Coconut) किस २.५ कप | Grated Coconut 2.5 cup

  • गुळ बारीक चिरून १ & १/४ कप | Jaggery Powder 1&1/4 cup

  • खसखस १ चमचा | Poppy seeds 1 tsp

  • साजूक तूप (Ghee) १ चमचा | Ghee 1 tsp

  • वेलची पूड १/२ चमचा | Cardamom Powder ½ tsp

4. मोदकाची उकड | For making Modak Dough

  • तांदळाची पिठी २.५ कप | Rice Flour 2.5cup

  • पाणी २.५ कप | Water 2.5 cup

  • मीठ १ चमचा | Salt 1 tsp

  • तूप १ चमचा | Ghee 1 tsp

Ganesh Chaturthi 2023 Recipe
Ganesh Chaturthi 2023 : गोल अन् मऊ बनतील बुंदीचे लाडू ही सोपी ट्रिक वापरा; पाहा रेसिपी, बाप्पाला आवडेल...

5. कृती

  • सर्वप्रथम कढई घेऊन त्यात चमचाभर तूप घाला नंतर त्यात नारळाचा किस आणि गूळ घालून चांगले परतवून घ्या.

  • गूळ वितळल्यानंतर त्याचा रंग बदलेल नंतर त्यात खसखस आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करा. सारण थंड होण्यास ठेवा.

  • त्यानंतर आंबेमोहर तांदूळ धुवून सुकवून घ्या त्याची पिठी तयार करा. एका पातेल्यात अडीच कप पाणी घेऊन त्यात मीठ आणि चमचाभर तूप घाला.

Ganesh Chaturthi 2023 Recipe
Cloves Benefits : रात्री झोपण्यापूर्वी खा फक्त २ लवंग, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे
  • पाणी उकळल्यानंतर मंद आचेवर तांदळाची पिठी घाला. पीठी चांगल्याप्रकारे ढवळून एकजीव करा. गॅस बंद करून झाकण १५ मिनिटे ठेवा.

  • तयार पीठ गरम असताना चांगल्याप्रकारे मळून घ्या. तयार पीठाच्या पाऱ्या बनवून त्यात मोदकाचे सारण भरा. कडा फुटणार नाही यापद्धतीने कळ्या पाडा.

  • तयार मोदकाची उकड काढा. केळीच्या पानात ठेवून वरुन तूपाची धार सोडा. तयार होतील २४ तास टिकतील असे उकडीचे मोदक

Ganesh Chaturthi 2023 Recipe
Ganpati Sthapana 2023: श्रीगणेशाची मूर्ती स्थापन करताना हे नियम पाळा, घरात नांदेल सुख-समृद्धी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com