Ganpati Sthapana 2023: श्रीगणेशाची मूर्ती स्थापन करताना हे नियम पाळा, घरात नांदेल सुख-समृद्धी

Ganesh Chaturthi 2023 : यंदा गणेशोत्सव १९ सप्टेंबरपासून सुरु होईल आणि २८ सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे.
Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023Saam Tv
Published On

श्री गणेशाची मूर्ती स्थापन करण्याचे नियम :

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी करते. १० दिवसांत गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते. यंदा गणेशोत्सव १९ सप्टेंबरपासून सुरु होईल आणि २८ सप्टेंबरला अनंत चतुर्थी आहे.

मोठ मोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पाचे आगमन होईल. तसेच थाटामाट श्रीगणेशाची प्राणप्रतिष्ठा करुन स्थापना केली जाईल. तसेच श्रीगणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवे ज्यामुळे घरातील वाद कमी होतील. घरात सुख आणि समृद्धी नांदेल यादिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्रीगणेश भक्तांचे सर्व संकट दूर करतात. जाणून घ्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना काय काळजी घ्याल.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी विशेष! वाहन-प्रॉपर्टी खरेदीसाठी उत्तम योग, शुभ मुहूर्त पाहा

1. दिशेकडे लक्ष द्या :

गणेशमूर्तीची (Ganesh Murti) प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्या. घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला गणपतीची मूर्ती स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका. ईशान्य कोपऱ्यातही गणेशाची मूर्ती ठेवू शकता.

2. श्रीगणेशाची सोंड :

श्रीगणेशाची सोंड डावीकडे कललेली असावी. जर चुकीच्या सोंडेचा गणपती घरात आणला तर सुख-समृद्धी आणि शांती नष्ट होईल. तसेच प्रगतीचे (Success) मार्ग थांबू शकतात.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला अद्भूत योग! या राशी होतील मालामाल

3. यापद्धतीची मूर्ती घरी आणा:

गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत गणेशाच्या हातात मोदक (Modak), चरणाजवळ मूषक असणे आवश्यक आहे.

4. गणपतीची मूर्ती :

श्रीगणेशाची मूर्ती ही नेहमी बसलेल्या स्थिती असावी. अशी मूर्ती अत्यंत शुभ मानली जाते. त्यामुळे घरात कुटुंबातील सदस्यांचे सौभाग्य वाढते. सर्व कार्यात यश मिळते.

Ganesh Chaturthi 2023
Ganesh Chaturthi 2023 Recipe : १० दिवस टिकतील असे खुसखुशीत रव्याचे मोदक; बनतील चविष्ट-टेस्टी, नक्की ट्राय करा

5. गणेशजींच्या मूर्तीचा रंग :

तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाच्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता. परंतु सिंदूर, लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेशमूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ आणि शुभ मानले जाते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com