Weight Loss Tips : लिंबू आपल्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असतो. लिंबू व्हिटॅमिनने भरपूर असतो. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन बी, कॉपर, पोटॅशियम, अँटिऑक्सिडेंट, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस यांसारखे अनेक तत्वे असतात.
त्याचबरोबर यामध्ये कॅलरी कमी प्रमाणात असते. सोबतच लिंबूमध्ये फॅट देखील कमी असते. लिंबूचा रस तुम्हाला फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतो. सोबतच अनेक प्रकारच्या आजारांसोबत दोन हात करण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरतो. तुमच्या स्वास्थ्यासाठी लिंबू अतिशय गुणकारी ठरू शकतो.
लिंबाचा रस तुमच्या जीवनामधील चव वाढवण्यास मदत करतो. तसेच तुमच्या आरोग्याला लाभदायक ठरतो. लिंबाचा रस तुमच्या त्वचेसाठी (Skin) अतिशय गुणकारी असतो. चेहरा साफ करण्यासाठी आणि तुमची त्वचा हेल्दी बनवण्यासाठी लिंबू फायदेशीर ठरतो.
1. हृदय चांगले ठेवतो :
लिंबामध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी आणि एंटीऑक्सीडेंटचे गुण असतात. हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्याचबरोबर लिंबू हा हृदय संबंधित समस्यांना वाचवण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर लिंबू स्ट्रोकचा खतरा कमी करतो. लिंबूमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हार्टच्या समस्येपासून तुम्ही वाचू शकता.
2. कॅन्सर :
लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन सी चे गुणधर्म उपलब्ध असतात. लिंबू फ्री मेडिकल्सच्या नुकसान पासून वाचवण्याचे काम करते. त्याचबरोबर लिंबू कॅन्सर सेल्सला वाढण्यापासून थांबवतो.
3. किडनी स्टोन :
लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते. जे किडनी स्टोन ला बाहेर काढण्यासाठी मदत करते. किडनी समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी लिंबू पाणीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. लिंबू किडनीमध्ये किडनी स्टोन होण्यापासून थांबवते.
4. पोटामध्ये इन्फेक्शन :
लिंबू तुम्हाला तुमच्या पोटामध्ये होणारे इन्फेक्शन पासून वाचवण्याचे काम करतो. यामध्ये एंटीबॅक्टरियल गुण असतात. जे तुम्हाला इन्फेक्शन पासून वाजवण्यास मदत करते.
5. वजन कमी करण्यासाठी लिंबू फायदेशीर :
तुमचे वजन सपाट्याने कमी करण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर ठरतो. कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस पिळून तुमच्या पोटावरची चरबी झपाट्याने कमी होण्यास मदत होते. यामध्ये घुलनशील पेक्टीन फायबर असते. जे झपाट्याने वजन कमी करण्यास फायदेशीर ठरते. तुम्हालाही तुमचे वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर गरम पाण्यामध्ये (Water) लिंबूचे सेवन केले पाहिजे.
6. ब्लड प्रेशर :
लिंबूच्या रसामध्ये पोटॅशियम असते. बेब्लेड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर लिंबू मुळे चक्कर येणे यासारख्या अनेक समस्यांपासून सुटकारा मिळू शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.