Side Effects Of Lemon Water :अतिप्रमाणात लिंबाच्या पाण्याचे सेवन, होऊ शकते शरीराला घातक !

लिंबाचे अधिक सेवन केल्यास होऊ शकते शरीराला नुकसान
Side Effects Of Lemon Water
Side Effects Of Lemon WaterCanva
Published On

Side Effects Of Lemon Water : आपल्या सगळ्यांना माहित आहे, लिंबू व त्याच्या पाण्याचे आपल्या आरोग्याला अधिक फायदे होतात. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू मिसळून ते पाणी प्यायल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते.

लिंबाचे पाणी (Lemon Water) हे पचनक्रियेसाठी खूप उपयुक्त ठरते, ज्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. परंतु, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर करणे हानिकारक ठरू शकते.

लिंबाचा वापर करून आपण ताप, हृदयविकार, यकृताची समस्या, रक्तदाब आदीपासून बचाव करता येऊ शकतो. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मध आणि लिंबाचे सेवन करण्याबद्दल केले जाते. लिंबू मध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढविण्या बरोबरच सौंदर्य वाढविण्यास देखील तेवढाच उपयुक्त आहे. (Side Effects Of Lemon Water In Marathi)

Side Effects Of Lemon Water
Detox Drink : सकाळी लिंबू पाणी पिण्याचे फायदे

भारतातील प्रसिद्ध आरोग्य तज्ञ 'निखिल वत्स' यांनी सांगितले की, लिंबूपाणी जास्त प्रमाणात पिणे आपल्या शरीरासाठी चांगले का नाही ते जाणून घेऊया.

लिंबामध्ये जीवनसत्त्व क चा भरपूर स्त्रोत आहे. आपल्या शरीरात या पोषक तत्वाची पातळी वाढली तर त्याचा परिणाम अनेक महत्वाच्या अवयवांवर होतो, त्यामुळे डॉक्टर देखील त्याचे मर्यादित प्रामाणात सेवन करण्याचा सल्ला देतात.

१. पोटदुखी -

जीवनसत्त्व (Vitamins) क च्या वाढत्या सेवनामुळे पोटातील आम्लाचा स्राव वाढण्याची भीती असते. त्यामुळे आम्लपित्त होण्याची शक्यता खूप वाढते. अतिप्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने उलट्या, जुलाब, मळमळ यासारख्या समस्या निर्माण होतात. बर्‍याच लोकांना गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्सचा त्रास होतो, त्यांनी लिंबूपाणी कमी प्यावे.

Side Effects Of Lemon Water
Benefits Of Lemon Tea : वजन कमी करायचे आहे ? चयापचयमध्ये सुधारणा करायची आहे ? या चहाचे सेवन करा

२. तोंडाला छाले पडणे -

बर्‍याच वेळा लिंबूमुळे तोंडातील दुर्गंधी नाहीशी होते व दातही साफ होतात परंतु, लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने त्यात असणाऱ्या सायट्रिक ऍसिडमुळे तोंडाच्या ऊतींना सूज येते. त्यामुळे तोंडाला फोड येतात व जळजळ होऊ लागतात.

३. दात दुखी -

लिंबू पाणी पिताना नेहमी स्ट्रॉचा वापर करा. ज्यामुळे लिंबाचा रस दातांना चिकटणार नाही. यामुळे दात दुखीचा व त्याचे अधिक कमजोर होण्याचे कारण असते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com