Food Safety : तोंडाला पाणी आणणारी मिठाई जीवावर बेतू शकते, चांदीच्या वर्कच्या नावाखाली पोटात जातंय विष; जाणून घ्या कसं ओळखाचं

festival sweet safety : सणासुदीच्या काळात मिठाईवर लावला जाणारा 'चांदीचा वर्क' हा आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, कारण त्यात होणाऱ्या भेरळीमुळे लिवर आणि किडनीला गंभीर नुकसान पोहोचू शकते.
how to check pure silver foil on sweets at home
how to check pure silver foil on sweets at home saam tv
Published On: 

दिवाळीची सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे.सणासुदीचे दिवस जवळ येऊ लागले की बाजारात विविध प्रकारच्या मिठाई पाहायला मिळते. काजू कतलीपासून बर्फीपर्यंत. अनेक मिठाईंची शोभा वाढवण्यासाठी त्यावर चांदीचा वर्क लावला जातो. चमकणारी ही मिठाई पाहताच कोणाच्याही तोंडाला पाणी सुटू शकते पण ही चमक तुमच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? बाजारात अस्सल चांदीच्या वर्क ऐवजी सर्रास भेसळयुक्त आणि नकली वर्कचा वापर केला जात आहे.

चांदीच्या नावाखाली ॲल्युमिनियमची भेसळ

जास्त नफा कमावण्याच्या नादात अनेक जण चांदीऐवजी ॲल्युमिनियम किंवा इतर स्वस्त व घातक धातूंचा वापर करतात. या प्रकारच्या भेसळयुक्त वर्कचे सेवन केल्याने शरीरातील महत्त्वाचे अवयव, विशेषतः लिवर आणि किडनीवर अतिशय वाईट परिणाम होतो. शरीरात दीर्घकाळ ॲल्युमिनियम किंवा भेसळयुक्त धातू गेल्यास पोटाचे आजार, मज्जासंस्थेचे विकार आणि शरीरात विषारी घटक साचू लागतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.

how to check pure silver foil on sweets at home
Health Tips : करपलेली किंवा जास्त भाजलेली चपाती खाल्ल्याने कर्करोगाचा धोका होतो का? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

मिठाई खरेदी करताना घ्यावयाची ३ महत्त्वाची काळजी:

हाताने घासून तपासा

मिठाईवरील वर्क हलकेच बोटाने घासा. जर तो अस्सल चांदीचा असेल, तर तो लगेच पुटकुळी होऊन पावडरसारखा बोटाला चिकटेल. मात्र, ॲल्युमिनियम असेल तर तो सहसा मोडत नाही आणि खडबडीत लागतो.

जाळून तपासा

वर्कचा एक छोटा तुकडा काढून तो जाळून पहा. अस्सल चांदीचा वर्क जळाल्यानंतर आकुंचन पावून लहान गोळीसारखा होतो. तर ॲल्युमिनियम किंवा भेसळयुक्त वर्क जळाल्यानंतर काळी किंवा तपकिरी राख तयार होते.

how to check pure silver foil on sweets at home
रात्रीच्या जेवणानंतर गोड खाण्याची सवय तुमच्या त्वचेसाठी कशी ठरते घातक? तज्ज्ञांकडून जाणून घ्या...

रंग आणि चमक ओळखा

नकली वर्क सहसा अतिशय पांढरा आणि डोळ्यांना सुईसारखा टोचणारा असतो, तर अस्सल चांदीच्या वर्कची चमक थोडी सौम्य असते.

सण हा आनंद वाटण्याचा काळ आहे, आजारपण ओढवून घेण्याचा नाही. त्यामुळे शक्यतो नेहमीच्या आणि विश्वासू दुकानातूनच मिठाई खरेदी करा. वर्कच्या शुद्धतेबद्दल शंका असल्यास, वर्क नसलेली साधी मिठाई खरेदी करणे केव्हाही सोईस्कर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com