भारतीय घरांमध्ये चपाती ही रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, आपण रोज करतो ती एक छोटीशी चूक आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते? अनेकदा लोकांना चपाती जास्त भाजून किंवा कडक करून खाण्याची सवय असते, ज्यामुळे ती काळी पडते. यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो, हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.
तज्ञांच्या मते, जेव्हा आपण कोणतीही खाण्याची वस्तू गरजेपेक्षा जास्त भाजतो किंवा क्रिस्पी बनवतो, तेव्हा ती काळी पडू लागते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेले कार्बोहायड्रेट्स. जास्त भाजल्यामुळे किंवा जळाल्यामुळे काही रसायने तयार होतात, ज्यांना 'एक्रिलामाइड' म्हणतात.
तज्ज्ञांच्या मते, एक्रिलामाइड हे सिगारेटच्या धुरामध्येही आढळते आणि यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. जर रोजच्या आहारात जास्त भाजलेली किंवा जळालेली पोळी खाल्ली गेली, तर शरीरात एक्रिलामाइडचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे भविष्यात कर्करोगाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
मात्र, जर याचे प्रमाण खूपच कमी असेल, तर थेट कर्करोग होतोच असे नाही. तरीही खबरदारी म्हणून अतिप्रमाणात जळालेले किंवा जास्त भाजलेले अन्न खाणे टाळणे योग्य ठरते.
शक्यतो पोळी थेट गॅसच्या फ्लेमवर भाजण्याऐवजी तव्यावर कापसाच्या कपड्याच्या मदतीने हलकी भाजून खावी.
थेट गॅसच्या संपर्कात पोळी भाजल्याने निघणाऱ्या गॅसमुळे आरोग्याला हानी पोहोचू शकते.
जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ, पापड किंवा ओव्हर-रोस्टेड मांस व चिकन खाणे टाळावे.
तव्यावर व्यवस्थित आणि हलकी सोनेरी-तपकिरी भाजलेली पोळी खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.