Antibiotic Side Effects : अँटिबायोटिक्स घेतल्यावर पचनक्रिया का बदलते? 'या' महत्त्वाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Antibiotic Side Effects : थोडीशी खोकला किंवा सर्दी झाली तरी लोक लगेच अँटिबायोटिक्स घेऊ लागतात. मुलांच्या बाबतीत तर असे वारंवार पाहायला मिळते. मात्र, याचा आपल्या पोटाच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो?
why do antibiotics cause diarrhea and bloating issues
why do antibiotics cause diarrhea and bloating issues saam tv
Published On: 

खोकला, सर्दी किंवा कोणताही संसर्गझाल्यावर लगेच अँटिबायोटिक्स घेणे आजकाल सामान्य झाले आहे. या औषधांमुळे लवकर आराम मिळतो आणि ती सहज उपलब्धही होतात. पण, याचा आपल्या 'गट हेल्थ'वर काय परिणाम होतो, याचा कधी विचार केला आहे का? या औषधांचा प्रभाव केवळ आजार निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियापुरता मर्यादित राहत नाही, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

ही औषधे आतड्यांमध्ये असणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन बिघडवू शकतात. यामुळे आपली पचनसंस्था बिघडू लागते.अँटिबायोटिक्समुळे भलेही संसर्गापासून सुटका होत असली, तरी पचनसंस्था बिघडण्याचा धोकाही वाढतो. आपण कोणती लक्षणे दुर्लक्षित करता कामा नयेत हे जाणून घ्या

पचनक्रियेत दिसू शकतात हे ५ बदल

जेव्हा आतड्यांमधील सूक्ष्मजीव अँटिबायोटिक्सवर प्रतिक्रिया देतात, तेव्हा उपचारादरम्यान तुम्हाला पचनाशी संबंधित बदल जाणवू शकतात. हे बदल प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळे असू शकतात

जुलाब लागणे

अँटिबायोटिक घेतल्यावर शौचास जाण्याच्या सवयीत अचानक बदल होऊ शकतो. अँटिबायोटिक्समुळे आतड्यांच्या कार्यावर वाईट परिणाम झाल्यामुळे असे होऊ शकते. यामुळे मायक्रोबियल ग्रुपचे संतुलन बिघडते आणि काही प्रकरणांत जुलाब होऊ शकतात.

why do antibiotics cause diarrhea and bloating issues
ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

पोट फुगणे किंवा गॅस होणे

अन्नाचे पचन आणि फर्मेंटेशन प्रक्रियेत आतड्यांचे बॅक्टेरिया महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा अँटिबायोटिक्स या बॅक्टेरियांमध्ये बदल करतात, तेव्हा फर्मेंटेशनच्या पद्धतीतही बदल होऊ शकतो. यामुळे अति प्रमाणात पोट फुगणे किंवा गॅस तयार होण्याची समस्या उद्भवू शकते.

शौचाच्या सवयीत बदल

अँटिबायोटिक्स पचनाशी संबंधित मायक्रोबियल प्रक्रियेवर प्रभाव पाडतात. तसेच ते आतड्यांच्या हालचालींवरही परिणाम करतात. काही लोकांना वारंवार शौचास जावे लागू शकते, तर काहींना बद्धकोष्ठता जाणवू शकते.

why do antibiotics cause diarrhea and bloating issues
जेवताना घाई करण्याची सवय तुम्हाला आणू शकते मोठ्या संकटात; पोटाचे आरोग्य बिघडवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या सत्य

पोटात कळा मारणे किंवा अस्वस्थता

मायक्रोबायोममधील कोणत्याही बदलामुळे फर्मेंटेशन आणि मायक्रोबियल चयापचय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे मायक्रोबायोम आणि आतड्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीमधील संबंध बिघडू शकतात. परिणामी, पोटात कळा मारणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते.

पचनाच्या दीर्घकालीन समस्या

अँटिबायोटिकचा कोर्स पूर्ण झाल्यानंतरही पोटाशी संबंधित काही समस्या कायम राहू शकतात. मायक्रोबायोम पूर्ववत होण्यासाठी वेळ लागू शकतो. प्रत्येक व्यक्तीनुसार ही बरे होण्याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते.

टीप: या लेखात दिलेली माहिती विविध स्रोतांवर आधारित असून ती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही आरोग्यविषयक निर्णय घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com