ताप येणे म्हणजे शरीराची संसर्गाशी लढण्याची एक नैसर्गिक आणि सशक्त प्रक्रिया असते. म्हणूनच साधा ताप आल्यावर घाबरून जाऊन लगेच औषधांचा मारा करणे योग्य नाही, तसेच तो पूर्णपणे हलक्यात घेणेही महागात पडू शकते. विशेषतः लहान बालकांमध्ये किंवा वृद्धांमध्ये साधी वाटणारी ही लक्षणे अनेकदा मोठ्या आजारांची नांदी ठरू शकतात.
अचूक तापमान समजण्यासाठी नेहमी डिजिटल थर्मामीटरचा वापर करावा. लहान मुलांमध्ये विशेषतः ३ महिन्यांपेक्षा लहान बालकांमध्ये १०.४°F ३८°C किंवा त्याहून अधिक रेक्टल तापमान असल्यास ते गांभीर्याने घेतले पाहिजे आणि तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते.
फक्त तापाचा आकडा पाहून आजाराची गंभीरता ठरत नाही. एखाद्या व्यक्तीला १०२°F ताप असताना श्वास घेण्यास त्रास, भ्रम किंवा तीव्र डिहायड्रेशन यांसारखी गंभीर लक्षणे असू शकतात, तर दुसऱ्या व्यक्तीमध्ये १०३°F ताप असूनही अशी आपत्कालीन लक्षणे नसतात. त्यामुळे तापासोबतच इतर लक्षरांकडे लक्ष देणेही अत्यंत आवश्यक आहे.
लहान मुलांमध्ये तापासोबत त्यांची वागणूक कशी आहे हे खूप महत्त्वाचे असते. जर मूल खूप सुस्त असेल, झोपेतून सहजासहजी उठत नसेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा फिट्स येत असतील, तर तापाची डिग्री किती आहे हे पाहण्यापेक्षा तातडीने डॉक्टरांकडे जाणे कधीही योग्य ठरते.
जर ताप सलग ४८ ते ७२ तासांपेक्षा जास्त काळ टिकून राहिला.
तापाचे प्रमाण वारंवार १०३°F किंवा त्याहून अधिक होत असेल.
तापासोबतच तीव्र डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, भ्रम, दौरे किंवा इतर कोणतीही गंभीर लक्षणे दिसत असतील.
अशा वेळी कोणताही उशीर न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.