Homemade spice drink: नसांमध्ये जमा झालेली चरबीही झटक्यात वितळेल; फक्त या 3 गोष्टी पाण्यात उकळून प्या, हात-पायांचं दुखणंही थांबेल

Black cardamom benefits: दालचिनी, मोठी वेलची आणि लवंग यांच्यापासून तयार होणाऱ्या ड्रिंकची रेसिपी जाणून घ्या. सांधेदुखी, थकवा आणि मुंग्या येण्यावर या उपायाचे फायदे असल्याचा दावा केला जातो; मात्र त्यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. लक्षणे कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Homemade spice drink
Homemade spice drinkSAAM TV
Published On: 

आजकाल अनेकांना हात-पाय दुखणं, सांधे आखडणं, सतत थकवा जाणवणं आणि पायांना मुंग्या येणं अशा त्रासांचा सामना करावा लागतो. हे त्रास कमी करण्यासाठी अनेक जण घरगुती उपाय शोधत असतात. अशाच एका घरगुती उपायाची माहिती यूट्यूबवरील एका व्हिडीओमध्ये डॉक्टर सलीम नावाच्या क्रिएटरने दिली आहे.

दालचिनी, मोठी वेलची आणि लवंग या तीन मसाल्यांपासून हे ड्रिंक तयार करता येतं. हे ड्रिंक नियमित प्यायल्याने नसांच्या समस्या, सांधेदुखी आणि शरीराचा थकवा कमी होण्यास मदत होते, असा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आलाय.

नसांची कमजोरी आणि वेदना कशामुळे होतात?

डॉ. सलीम यांच्या म्हणण्यानुसार, नसांच्या समस्या किंवा नसांमध्ये अडथळा निर्माण होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल, अतिरिक्त चरबी, इन्फेक्शन, हार्मोन्समधील असंतुलन तसंच किडनी किंवा यकृताशी संबंधित आजार यांचा त्यात समावेश होतो.

Homemade spice drink
High Cholesterol: नसांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? दररोज प्या ही 5 ड्रिंक्स, ट्रायग्लिसराइड्सही कमी होईल

या समस्यांमुळे शरीरात वेगवेगळे त्रास जाणवू शकतात. हात-पाय दुखणं, थकवा येणं, मुंग्या येणं आणि शरीरात अशक्तपणा जाणवणं अशी लक्षणं दिसू शकतात.

तीन मसाल्यांपासून ड्रिंक कसं तयार करायचं?

हे ड्रिंक बनवण्यासाठी घरात सहज मिळणारे तीन मसाले लागतात. हे ड्रिंक तयार करण्यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या आणि ते उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात दालचिनीचा एक छोटा तुकडा, एक मोठी वेलची आणि दोन ठेचलेल्या लवंगा घाला. हे मिश्रण दोन ते तीन मिनिटं उकळू द्या. त्यामुळे मसाल्यांमधील घटक पाण्यात मिसळतील.

त्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थोडे थंड होऊ द्या. तुम्हाला गोड चव आवडत असेल तर त्यात थोडं मध किंवा गूळ घालू शकता. मात्र मधुमेह असलेल्या व्यक्तींनी या ड्रिंकमध्ये मध किंवा गूळ न घालण्याचा सल्ला व्हिडीओमध्ये देण्यात आलाय.

हे ड्रिंक पिण्याची योग्य वेळ कोणती?

व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रात्री जेवण झाल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने हे ड्रिंक प्यावं. सलग १४ ते १५ दिवस हे ड्रिंक प्यायल्यास शरीरातील ऊर्जा वाढण्यास, सांधेदुखी कमी होण्यास आणि नसांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते असा दावा करण्यात आला आहे.

मात्र, या ड्रिंकमुळे असे फायदे होतात याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध असल्याचे या माहितीवरून सांगता येत नाही. त्यामुळे केवळ या उपायावर अवलंबून राहू नये.

Homemade spice drink
Four eggs a day: दिवसाला 4 अंडी खाणं खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितलं कोलेस्ट्रॉलवर कसा होतो परिणाम

ड्रिंक प्यायल्यानंतर करा हे काम

या व्हिडीओमध्ये आणखी एक उपाय सांगण्यात आला आहे. हे ड्रिंक प्यायल्यानंतर साधारण १५ मिनिटांनी एक छोटा चमचा बडीशेप चावून खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बडीशेप खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मसाल्यांमधील महत्त्वाचे घटक शरीराला चांगल्या प्रकारे मिळण्यास मदत होऊ शकते, असं व्हिडीओमध्ये सांगण्यात आलंय.

आहारात जवस आणि चिया सीड्सचाही करा समावेश

नसा आणि सांधे निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे. यासाठी जवसाच्या बिया आणि चिया सीड्सचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. तर चिया सीड्समध्ये लोह, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराला आवश्यक पोषण मिळवून देण्यास मदत करतात. त्यामुळे योग्य प्रमाणात या बियांचा आहारात समावेश केल्यास शरीराला अतिरिक्त पोषण मिळू शकते.

Homemade spice drink
Stroke risk: रोज 2 मिनिटांची तुमची ही सवय स्ट्रोकचा धोका करते कमी; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com