High Cholesterol: नसांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? दररोज प्या ही 5 ड्रिंक्स, ट्रायग्लिसराइड्सही कमी होईल

Drinks to lower cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. ग्रीन टी, लिंबू पाणी, बीटचा ज्यूस, जास्वंदाचा चहा आणि ओट्स ड्रिंक आहाराचा भाग म्हणून कसे मदत करू शकतात, जाणून घ्या.
Drinks to lower cholesterol
Drinks to lower cholesterolsaam tv
Published On

शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढलं तरी अनेक वेळा त्याची लक्षणं दिसतील असं नाही. पण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त काळ वाढलेले राहिल्यास हृदयाचा आजार, स्ट्रोक आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधं घेणं, रोज व्यायाम करणं आणि चांगला आहार घेणं गरजेचं आहे. यासोबत काही साधे ड्रिंक्स घेतल्यानेही कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. यातील बहुतेक ड्रिंक्स घरी सहज तयार करता येतात.

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये शरीरासाठी चांगले अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज १ ते २ कप ग्रीन टी घेणं फायदेशीर ठरू शकतं.

लिंबू पाणी

लिंबामध्ये व्हिटॅमिन C मोठ्या प्रमाणात असते. हे एक अँटीऑक्सिडंट आहे आणि शरीरातील चरबी योग्य प्रकारे पचण्यास मदत करू शकते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यात लिव्हरचं महत्त्वाचं काम असतं आणि लिंबू पाणी लिव्हरला मदत करू शकते. त्यामुळे सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय लावता येऊ शकते.

Drinks to lower cholesterol
Cancer symptoms: वीकेंडची मजा ठरू शकते धोकादायक! रिलॅक्स होण्यासाठी केलेल्या ‘या’ सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका

बीटचा ज्यूस

बीटमध्ये नायट्रेट्स नावाचं नैसर्गिक घटक असतात. हे घटक शरीरातील रक्तप्रवाह चांगला होण्यास आणि रक्तवाहिन्या सैल राहण्यास मदत करतात. बीटचा रस ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतो.

Drinks to lower cholesterol
Heart attack prevention: हार्ट अटॅक येण्यापासून टाळायचाय? आजपासूनच बंद करा 'या' चुका; 14 गोष्टींवर ठेवा नियंत्रण

जास्वंदाची चहा

जास्वंदाच्या फुलांपासून तयार केलेला चहा हृदयासाठी चांगला मानला जातो. या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. त्याचप्रमाणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही याचा फायदा होऊ शकतो.

ओट्स ड्रिंक

ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचं एक प्रकारचा फायबर असतं. हे फायबर पोटात गेल्यावर कोलेस्ट्रॉलला बांधून ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल शरीरात जाण्याचं प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत मिळू शकते.

Drinks to lower cholesterol
Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com