Shravan Recipes : उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? उपवासाची चव दुप्पट करणाऱ्या या भन्नाट रेसिपी नक्की ट्राय करा

Shravan Fast Tasty Recipes : साबुदाणा खिचडीचा कंटाळा आला आहे? मग उपवासासाठी या झटपट, चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी नक्की ट्राय करा. श्रावणातील प्रत्येक उपवास बनेल खास.
 Shravan Recipes : उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? उपवासाची चव दुप्पट करणाऱ्या या भन्नाट रेसिपी  नक्की ट्राय करा
Shravan Recipes : उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? उपवासाची चव दुप्पट करणाऱ्या या भन्नाट रेसिपी नक्की ट्राय कराgemini
Published On

श्रावण महिना सुरू झाला की उपवासाचे दिवस सुरू होतात. त्यात आता साबुदाणा आणि उपवास याच्या नात्याबद्दल वेगळ सांगायलाच नको. तेच रटाळ साबुदाण्याची खिचडी आणि इतर पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर या रेसिपी नक्की ट्राय करा. श्रावणात वातावरण थंड असते , त्यामुळे पचनास हलके तसेच पौष्टिक हलके पदार्थ खाल्ले पाहिजेत. खाली दिलेल्या रेसिपी उपवासाला एकदम बेस्ट आणि झटपट होणाऱ्या देखील आहेत.

भगरीचे थालीपीठ
भगरीचे थालीपीठ google

भगरीच थालीपीठ

एका भांड्यात भगरीचे पीठ घ्या, त्यात किसलेला बटाटा, शेंगदाण्याचा कूट, मिरची- जिरे पेस्ट, राजगिरा पीठ आणि मीठ एकत्र करा. सुरूवातीला थोडे थोडे पाणी टाकत पीठ घट्ट मळून घ्या. 10 मिनिटे झाकून ठेवा. बटर पेपरवर किंवा सुती कापडावर थोडे तूप लावून पिठाचा गोळा भाकरीसारखा थापा. तव्यावर खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरमागरम थालीपीठ दह्यासोबत किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.

 Shravan Recipes : उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? उपवासाची चव दुप्पट करणाऱ्या या भन्नाट रेसिपी  नक्की ट्राय करा
First Shravan Monday 2026 : श्रावणातील पहिला सोमवार कधी? पूजा कशी करावी आणि कोणती शिवमूठ वाहावी?
रताळ्याचे गोड काप
रताळ्याचे गोड काप google

रताळ्याचे गोड काप

रताळी स्वच्छ धुवून घ्या. मग त्याचे जाड काप पाण्यात टाका. पॅनमध्ये तूप गरम करा. तूपात रताळी घोळून घ्या. सोनेरी रंग येईपर्यंत रताळी शिजून घ्या. मग त्यात गुळ टाका. चवीसाठी वेलची पावडर घाला. थोडा वेळ वाफवून. झटपट रताळ्याचे गोड काप तयार

 Shravan Recipes : उपवासाला साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? उपवासाची चव दुप्पट करणाऱ्या या भन्नाट रेसिपी  नक्की ट्राय करा
Breastfeeding Mothers : बालकांना स्तनपान करणाऱ्या मातांसाठी या ५ गोष्टी नक्की कराव्यात, तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
राजगीरा आणि  मखाण्याची खीर
राजगीरा आणि मखाण्याची खीर google

राजगिरा आणि मखाण्याची खीर

तूपात मखाणे गरम करायला घ्या. मखाणे हलके तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. क्रश करून बाजूला काढून घ्या. कढईत दूध गरम करा थोडे घट्ट झाल्यावर त्यात भाजलेले मखाणे आणि राजगिरा टाका. हे मिश्रण मंद आचेवर मखाणे मऊ होईपर्यंत उकळून घ्या. शेवटी त्यात गुळ, सुका मेवा आणि वेलची पूड घालून थोडा वेळ शिजू द्या. उपवासाचे पौष्टिक तसेच गरमागरम खीर खाण्यासाठी तयार.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com