Beauty Skin Tips : 14 ऑगस्टला चेहऱ्यावर अप्लाय करा 'या' गोष्टी; दुसऱ्याच दिवशी स्वातंत्र्य दिनी स्किन हिऱ्यासारखी चमकेल

Face Glowing Tips for Independence Day : उद्या तर आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्त तुम्ही सुद्धा स्पेशल दिसण्यासाठी काही ना काही करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ब्युटी टिप्स सांगणार आहोत.
Face Glowing Tips for Independence Day
Beauty Skin TipsSaam TV
Published On

प्रत्येक स्पेशल आणि खास दिवसासाठी आपण एक दिवस आधीपासून तयारी करण्यास सुरुवात करतो. घरी काही सण समारंभ असल्यास सर्व महिला आणि मुली मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात नटतात आणि साज श्रृंगार करून तयार होतात. अशात उद्या तर आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्त तुम्ही सुद्धा स्पेशल दिसण्यासाठी काही ना काही करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास ब्युटी टिप्स सांगणार आहोत.

Face Glowing Tips for Independence Day
Beauty Skin : महागड्या पावडर शिवाय गावच्या मुली नक्षत्रासारख्या सुंदर कशा दिसतात? वाचा सौंदर्याचं रहस्य

फक्त तीन गोष्टी तुम्हाला तु्मच्या चेहऱ्यावर अप्लाय करायच्या आहेत. या तीन गोष्टी असल्यास तुम्ही सुंदर दिसू शकता. रात्री झोपण्याआधी तुम्हाला चेहऱ्यावर हे प्रोडक्ट अप्लाय करावे लागणार आहेत.

काय आहेत त्या तीन वस्तू?

बारीक साखर

तांदळाचे पीठ

हळद

फक्त तीन गोष्टी वापरून तुम्ही हा फेस पॅक बनवू शकता. साखरेमुळे आपली त्वचा एक्सफोलिएट होते. त्यामुळेच चेहऱ्यावर एक सुंदर आणि मस्त चमक येते. तसेच तांदळाचे पीठ चेहऱ्यावरील काळे डाग मिटवण्यासाठी मदत करतात. तसेच हळद आपल्या त्वचेला सॉफ्ट करते.

असे करा अपल्याय

सर्वात आधी साखर एका भांड्यात काढून थोडी वितळवून घ्या. लक्षात ठेवा की आपल्याला साखरेचा पूर्ण पाक करायचा नाही. त्यामुळे साखर फक्त थोडी वितळवून घ्या. साखर वितळली की ती नॉर्मल टेंप्रेचरला येऊ द्या. त्यानंतर यामध्ये तांदळाचे पीठ मिक्स करा. तांदळाचे पीठ आणि हळद एकत्र मिक्स करून ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करून घ्या.

ही पेस्ट चेहऱ्यावर अप्लाय करताना आधी कपाळावर हलका लेप लावा. त्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर हा फेस फॅक अप्लाय करून घ्या. किमान २० मिनिटे तरी हे मिश्रण चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास उत्तम. यानंतर चेहऱ्याला हलकी स्टिम सुद्धा घ्या. याने तुमची डेड स्किन निघून जाईल आणि चेहरा अगदी हिऱ्यासारखा चमकेल.

Face Glowing Tips for Independence Day
Beauty Skin Tips : रखरखत्या उन्हात मेकअप मेल्ट होतोय? मग 'या' टीप्स फॉलो करा, घाम आला तरी स्किन ग्लो करेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com