Exercise and cancer: व्यायाम वाचवतो तुमचा जीव! जीमच्या एका सेशनने कॅन्सरचा धोका तब्बल 30% होतो कमी, नवी संशोधनातून उघड

Physical activity and cancer: नुकत्याच झालेल्या एका मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे की, नियमितपणे केलेले व्यायाम शरीराला कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापासून वाचवू शकतात.
Exercise and cancer
Exercise and cancersaam tv
Published On
Summary
  • व्यायाम केवळ फिटनेससाठी नव्हे तर कॅन्सरपासून संरक्षणासाठीही आहे.

  • एकाच व्यायाम सत्राने कॅन्सर पेशींची वाढ थांबू शकते.

  • रेसिस्टन्स ट्रेनिंग आणि HIIT दोन्ही कॅन्सरविरोधी प्रभावी आहेत.

आपल्या प्रत्येकाला फीट राहायचं आहे. यासाठी आपण व्यायाम करतो तसंच जीमला जातो. मात्र व्यायाम केवळ फिट दिसण्यासाठी किंवा वजन घटवण्यासाठी नसतो तर तो कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. अलीकडेच Edith Cowan University च्या शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला. या अभ्यासातून असं समोर आलंय की, एकाच व्यायाम सेशनने कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवण्यात लक्षणीय फरक पडतो.

या नव्या संशोधनात तज्ज्ञांनी पाहिलं की, एक व्यायाम सेशन शरीरात असे बदल घडवतो, जे कॅन्सर पेशींच्या वाढीला रोखतात. यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळते आणि शरीरात अशा गोष्टी निर्माण होतात जे कॅन्सरविरोधी काम करतात. हा अभ्यास ‘Breast Cancer Research and Treatment’ या मेडिकल मॅगझिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जीमला नाही गेलात तरी हरकत नाही

या अभ्यासातील सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे तुम्हाला जास्त वेळ जिममध्ये घालण्याची गरज नाही. इतकंच नाही तर तुम्ही जीमला न जाता घरीच व्यायाम केलात तरी याचा फायदा होतो. दररोज काही मिनिटांचा साधा व्यायामदेखील कॅन्सरविरोधी परिणाम घडवतो. व्यायामाच्या केवळ एका सेशनमुळे पेशींमध्ये सकारात्मक बदल घडतात, जे भविष्यातील कॅन्सरच्या धोक्यापासून संरक्षण करू शकतात.

कोणता व्यायाम अधिक फायदेशीर?

तज्ज्ञांनी दोन प्रकारच्या व्यायाम पद्धतींचा अभ्यास केला, ज्यामध्ये-

  • रेसिस्टन्स ट्रेनिंग (RT) म्हणजे वजन उचलण्याचा किंवा स्नायूंचा व्यायाम

  • हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) म्हणजे तीव्र प्रमाणातील व्यायाम.

Exercise and cancer
Silent heart attack risk: सायलेंट हार्ट अटॅकपूर्वी शरीरात होतात हे बदल; कोणाला असतो जास्त धोका, जाणून घ्या

या दोन्ही प्रकारच्या व्यायामामुळे शरीरात मायोकिन्स नावाचे अँटी-कॅन्सर प्रोटीन स्रवले जातात. MDA-MB-231 नावाच्या ब्रेस्ट कर्करोग पेशींवर याचा परिणाम दिसून आला. म्हणजेच त्या पेशींची वाढ कमी झाली. संशोधकांच्या मते, "हा परिणाम कॅन्सर परत येण्याचा धोका कमी करण्यास मदत करू शकतो."

RT आणि HIIT म्हणजे काय?

रेसिस्टन्स ट्रेनिंग

हा व्यायाम शरीरातील मसल्सना बळकट करणारा आहे. डंबेल्स, रेसिस्टन्स बँड, केटलबेल्स किंवा केवळ शरीराचं वजन वापरून केला जातो. मुख्य म्हणजे हा व्यायाम केवळ बॉडीबिल्डर्ससाठी नसून सामान्य व्यक्तींसाठीही फायदेशीर आहे.

हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT)

थोड्या वेळासाठी तीव्र प्रमाणात व्यायाम करून त्यानंतर काही काळ विश्रांती घेणं हे HIIT चं स्वरूप आहे. उदाहरणार्थ, ३० सेकंद जंपिंग जॅक्स, १५ सेकंद विश्रांती, मग ३० सेकंद बर्पीज. हे १५–३० मिनिटं चालू शकतं.

Exercise and cancer
Sleep related habits: झोपेबाबत 'ही' चूक कराल तर 172 आजार लागतील मागे; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासातून खुलासा

व्यायामाचा कॅन्सरवर कसा परिणाम होतो?

सामान्यपणे ज्यावेळी आपण कॅन्सर टाळण्याच्या उपायांबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, योग्य आहार, धूम्रपान टाळणं, सनस्क्रीन वापरणं वगैरे. पण त्याशिवाय एक मोठा उपाय म्हणजे व्यायाम.

Exercise and cancer
Heart attack symptoms: छातीत दुखण्याव्यतिरीक्त हार्ट अटॅकची 'ही' इतरंही लक्षणं दिसतात; रात्रीच्या वेळेस होणारे बदल पाहा

व्यायामामुळे काय होतं?

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जी शरीरातल्या नकारात्मक पेशींना नष्ट करण्यात मदत करते.

  • शरीरातली Inflammation प्रक्रिया कमी होते, जी कॅन्सरचं प्रमुख कारण असू शकते.

  • शरीरातील इन्सुलिन आणि इस्ट्रोजेन हे हार्मोन्स संतुलित राहतात, जे असंतुलित झाल्यास काही कॅन्सरचं वाढू शकतात.

  • जास्त वजन हे अनेक कर्करोगाचं कारण ठरू शकतं आणि व्यायामामुळे ते टाळता येतं.

Q

व्यायाम कॅन्सरपासून कसे संरक्षण करू शकतो?

A

व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, दाहक प्रक्रिया कमी होते आणि कॅन्सरविरोधी प्रोटीन्स (मायोकिन्स) स्रवतात, ज्यामुळे कॅन्सर पेशींची वाढ रोखली जाते.

Q

संशोधनानुसार एक व्यायाम सत्राचा काय परिणाम होतो?

A

एका व्यायाम सत्रानंतर शरीरातील पेशींमध्ये सकारात्मक बदल होतात आणि ब्रेस्ट कॅन्सर पेशींची वाढ कमी होते.

Q

रेसिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे काय आणि त्याचा फायदा काय?

A

रेसिस्टन्स ट्रेनिंग म्हणजे वजन उचलणे किंवा स्नायूंवर दबाव आणणारा व्यायाम. यामुळे स्नायू बळकट होतात आणि कॅन्सरविरोधी प्रोटीन्सचे उत्पादन होते.

Q

HIIT म्हणजे काय आणि ते कसे करावे?

A

HIIT म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, ज्यामध्ये थोड्या वेळासाठी तीव्र व्यायाम करून विश्रांती घेतली जाते. उदा., ३० सेकंद बर्पीज, १५ सेकंद विश्रांती.

Q

व्यायामामुळे कोणते हार्मोन्स संतुलित राहतात आणि का महत्त्वाचे आहेत?

A

व्यायामामुळे इन्सुलिन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स संतुलित राहतात. यांचे असंतुलन कॅन्सरचे कारण बनू शकते, म्हणून त्यांचे नियमन महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com