Sleep related habits: झोपेबाबत 'ही' चूक कराल तर 172 आजार लागतील मागे; आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अभ्यासातून खुलासा

172 diseases risk sleep: नुकत्याच झालेल्या एका मोठ्या अभ्यासात धक्कादायक खुलासा झाला आहे की, झोपेशी संबंधित काही चुकांमुळे तब्बल १७२ प्रकारच्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.
Sleep related habits
Sleep related habitssaam tv
Published On
Summary
  • झोपेचा नियमितपणा आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

  • अनियमित झोपेमुळे १७२ प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो.

  • झोपेचे तासांपेक्षा वेळापत्रक जास्त महत्त्वाचे आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तज्ज्ञ सतत सांगतात की, जास्त झोप घेतल्यास आरोग्याला धोका निर्माण होतो. यामुळे हृदयविकार, मानसिक आजार आणि मृत्यूचाही धोका असल्याचं समोर आलं आहे. पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका जागतिक संशोधनात ही समजूत चुकीची ठरली आहे.

तज्ज्ञांनी केलेल्या या अभ्यासात स्पष्ट करण्यात आलंय की, प्रत्यक्षात झोपेचे तास नव्हे, तर झोपेचा नियमितपणा जास्त महत्त्वाचा आहे. या अभ्यासातून अनियमित झोपेमुळे एक किंवा दोन नाही तर तब्बल १७२ आजार आपल्या मागे लागत असल्याचं समोर आलंय.

जून महिन्यात 'हेल्थ डाटा सायन्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात जवळपास ९०,००० लोकांच्या सवयींचा सात वर्ष अभ्यास करण्यात आला. यामध्ये या सर्वांनी त्यांच्या मनगटावर फिटनेस ट्रॅकर्स बांधले होते. अनेक लोकांनी असा दावा केला की, ते रोज ८ तासांहून अधिक झोपतात. पण जेव्हा ट्रॅकर्सद्वारे जेव्हा झोपेचे तास समोर आले तेव्हा त्यापैकी बरेच लोक प्रत्यक्षात फक्त ६ तास किंवा त्याहूनही कमी झोप घेत असल्याचं समोर आलं.

Sleep related habits
Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

झोप झोपेचं वेळापत्रक महत्त्वाचं

हा अभ्यास चीनमधील थर्ड मिलिटरी मेडिकल युनिव्हर्सिटीचे डॉ. किंग चेन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, झोप किती वेळ घेतली यापेक्षा कोणत्या वेळेस व्यक्ती झोपली आहे, किती वेळा मध्ये जाग आली आणि दररोजची झोप किती स्थिर आहे हे मुद्दे आरोग्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरतात.

जर एखाद्याची झोपेची वेळ दररोज बदलत असेल म्हणजे कधी उशिरा झोपणं, कधी लवकर उठणं, कधी पूर्ण झोप न होणं अशा प्रकारच्या अनियमित झोपेमुळे तब्बल १७२ प्रकारच्या आजारांचा धोका वाढतो ही धक्कादायक माहिती या अभ्यासातून समोर आलं आहे.

Sleep related habits
Silent heart attack risk: सायलेंट हार्ट अटॅकपूर्वी शरीरात होतात हे बदल; कोणाला असतो जास्त धोका, जाणून घ्या

अनियमित झोपेमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात?

  • पार्किन्सनसारख्या न्युरोलॉजिकल आजाराचा धोका ३७% वाढतो

  • टाइप २ डायबिटीजचा धोका ३६% ने वाढतो

  • किडनी फेल्युअरचा धोका २२% ने वाढतो

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, ९२ आजारांपैकी २०% आजार केवळ नियमित आणि दर्जेदार झोप घेऊन टाळता येऊ शकतात, असं या संशोधनातून स्पष्ट झालं.

आतापर्यंत तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सात ते नऊ तास झोप घेणं गरजेचं होतं. पण या अभ्यासाप्रमाणे आता, फक्त झोपेच्या तासांचं गणित महत्त्वाचं नाही तर झोप किती वेळ घेतली हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे झोप नियमित आणि एकसंध असणं आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

Sleep related habits
Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

अपुऱ्या आणि अनियमित झोपेमुळे COPD (फुफ्फुसांचा विकार), किडनी फेल्युअर आणि मधुमेहासारख्या आजारांचा धोका अधिक असल्याचं देखील अभ्यासातून निष्पन्न झालं.

Q

संशोधनानुसार झोपेच्या नियमितपणाचे काय महत्त्व आहे?

A

झोप किती वेळ झाली यापेक्षा ती कोणत्या वेळी, कशी आणि किती स्थिर आहे हे आरोग्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. अनियमित झोपेमुळे १७२ आजारांचा धोका वाढतो.

Q

अनियमित झोपेमुळे कोणत्या आजारांचा धोका वाढतो?

A

अनियमित झोपेमुळे टाइप २ डायबिटीज, किडनी फेल्युअर, पार्किन्सन आणि COPD सारख्या आजारांचा धोका वाढतो.

Q

या अभ्यासात किती लोकांचा समावेश करण्यात आला?

A

या अभ्यासात जवळपास ९०,००० लोकांच्या झोपेच्या सवयींचा सात वर्षांच्या कालावधीत अभ्यास करण्यात आला.

Q

फिटनेस ट्रॅकर्सच्या माध्यमातून काय निष्कर्ष निघाले?

A

फिटनेस ट्रॅकर्सच्या आधारे असे स्पष्ट झाले की, अनेकांनी दावा केलेली ८ तासांची झोप खरोखरीच फक्त ६ किंवा त्याहून कमी तासांची होती.

Q

नियमित आणि दर्जेदार झोपेचा फायदा काय आहे?

A

नियमित आणि दर्जेदार झोप घेऊन ९२ आजारांपैकी २०% आजार टाळता येऊ शकतात, असे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com