

आपल्यापैकी काही जणांना हाताला खूप घाम येण्याची समस्या जाणवते. यामुळे समोरच्या व्यक्तीला हात मिळवणंही आपण टाळतो. ही एक सामान्य बाब म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र हे तुम्हाला महागात पडू शकतं.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सतत घाण येणं हे केवळ हीट किंवा स्ट्रेसमुळे होत नाही. तर ही गोष्टी तुमच्या आरोग्याशी संबंधित असू शकते. त्यामुळे असा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
जर तुमच्या हाताला जास्त प्रमाणात घाम येत असेल तर त्याला हायपरहायड्रोसिस असं म्हणतात. या परिस्थितीत शरीराला गरज नसतानाही घाम येतो. यामध्ये हात, पाय, काखेत किंवा चेहऱ्याला प्रचंड घाम येतो. २०२२ मध्ये केलेल्या एका अभ्यासानुसार, जास्त घाम येण्याचा संबंध हा क्षयरोग आणि अति मद्यपानाशी संबंधित आहे.
हातांना जास्त घाम येण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे Primary Hyperhidrosis. या अवस्थेत कोणताही आजार नसतानाही घाम येतो. ही समस्या बहुतेक वेळा लहानपणापासून सुरू होते. यामध्ये हाताच्या दोन्ही तळव्यांना सारखाच घाम येतो. झोपेत असताना व्यक्तीला घाम येत नाही.
हातांमध्ये sweat glands ची संख्या जास्त असल्यामुळे ताणाला ते पटकन प्रतिसाद देतात. परीक्षेच्या वेळी, सार्वजनिक ठिकाणी बोलताना किंवा तणावपूर्ण परिस्थितीत हात घामाने ओले होतात.
थायरॉईड ग्रंथी जास्त एक्टिव्ह झाल्यास शरीरातील मेटाबॉलिझम वाढतो आणि घाम जास्त येतो. यासोबत हृदयाचे ठोके वाढणं, वजन कमी होणं, हात थरथरणं, उष्णता सहन न होणं आणि चिडचिड अशी लक्षणं दिसू शकतात.
विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ब्लड शुगर कमी झाल्यास घाम येणं, हात थरथरणं आणि चक्कर येणं अशी लक्षणं पाहायला मिळतात. हाताला घाम येण्याबरोबर अशक्तपणा, गोंधळ किंवा भूक लागल्यास रक्तातील साखर तपासणे आवश्यक आहे.
प्युबर्टी, गर्भधारणा किंवा मेनोपॉजच्या काळात शरीरात हार्मोन्समध्ये बदल होतात. त्यामुळे काहींना हाताला जास्त घाम येण्याचा त्रास जाणवू शकतो.
काही औषधं तुमच्या नर्व्हस सिस्टिमवर परिणाम करणात. त्यामुळे या औषधांच्या सेवनामुळे तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो. नवीन औषध सुरू केल्यानंतर अशी समस्या सुरू झाली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.