Rare cancer symptoms: शेतकऱ्याला थकव्यामागे दडलेला दुर्मिळ कॅन्सर, आतड्यांमध्ये १४ सेमीचा ट्यूमर, डॉक्टरांनी वाचवले प्राण

Fatigue warning signs: नाशिकमधील ५५ वर्षीय शेतकऱ्याला सतत थकवा जाणवत होता. तपासणीत दुर्मिळ GIST कॅन्सर आढळला. वेळेवर उपचार आणि कठीण शस्त्रक्रियेमुळे त्यांना नवजीवन मिळाले. थकव्याकडे दुर्लक्ष करणे किती धोकादायक ठरू शकते, ही खरी घटना दाखवते.
Rare cancer symptoms
Rare cancer symptomssaam tv
Published On

नाशिकमधील ५५ वर्षीय शेतकरी अनिल कदम यांना गेल्या काही दिवसांपासून सतत थकवा जाणवत होता. मात्र या थकव्यामागचं नेमकं कारण त्यांच्या लक्षात येत नव्हतं. ज्यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून तपासणी केली तेव्हा हा थकवा जीवघेणा आजार असल्याचं त्यांच्या लक्षात आला. वेळेवर केलेल्या उपचारांमुळे आणि शस्त्रक्रियेच्या मदतीने त्यांना नवजीवन मिळालं आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये अनिल कदम यांना सतत थकवा जाणवू लागला. शेतीचं काम करत असल्याने हा त्रास कामामुळेच होत असावा, असं त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला वाटत होतं. पण काही दिवसांनी त्यांना उलट्या होणं आणि गिळताना त्रास होणं अशा समस्याही जाणवू लागल्या. यानंतर कुटुंबियांनी वेळ न घालवता त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं.

Rare cancer symptoms
Heart oxygen deficiency: धाप लागतेय, थकवा जाणवतोय? हृदयाला रक्तपुरवठा न होणाऱ्या ४ लक्षणांकडे इग्नोर करू नका

डॉक्टरांच्या तपासणीतून धक्कादायक सत्य उघड

ज्यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा तपासणीत त्यांचं हिमोग्लोबिन खूपच कमी झाल्याचं समोर आलं. यावेळी त्यांचं हिमोग्लोबिन फक्त ३.५ g/dL असल्याचं समजलं. त्यामुळे त्यांना अ‍ॅनिमियाचं निदान करण्यात आलं. अजून काही तपासण्या केल्या असत्या त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव सुरू असल्याचं समजलं. एंडोस्कोपी आणि बायोप्सीमधून त्यांना GIST (गॅस्ट्रोइंटेस्टिनल स्ट्रोमल ट्यूमर हा दुर्मिळ कॅन्सर असल्याचं निदान झालं.

आतड्यांमध्ये सापडला मोठा ट्यूमर

सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या लहान आतड्याच्या भागात तब्बल १४ सेंमीचा मोठा ट्यूमर असल्याचं दिसलं. हा ट्यूमर पोट, स्वादुपिंड आणि आतड्यांच्या काही भागांपर्यंत पसरला होता. विशेष म्हणजे इतका मोठा आजार असूनही त्यांना फक्त अशक्तपणा जाणवत होता.

कुटुंबीयांनी सांगितलं की, उपचार सुरू असताना एकदा ते शेतात गेले असता अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यावेळी त्यांना खूप घाम आला आणि ते खाली पडले. त्यानंतर त्यांना शौचातून रक्तस्राव होण्याचा त्रासही होऊ लागला. अशावेळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Rare cancer symptoms
Eye health tips: डोळ्यांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करूच नका; वेळेत उपचार केल्यास अंधत्वाचा धोका होईल कमी

डॉक्टरांनी त्यांना कॅन्सरसाठी दिली टार्गेटेड थेरपी सुरू केली. मात्र औषध घेतल्यानंतर लगेचच त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आणि त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं. यानंतर लिलावती रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीची होती. डॉक्टरांच्या टीमने पोटातील ट्यूमरसोबतच त्याला लागून असलेले काही अवयवही काढून टाकले.

Rare cancer symptoms
Child eye cancer: बापरे! 5 वर्षांच्या 20 मुलांना डोळ्यांचा कॅन्सर; वाचा नेमकी लक्षणं काय आहेत?

डॉक्टरांच्या मते, रुग्णाचा आधीच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याला रक्ताची गरज भासली होती. त्यामुळे उपचार करणं हे अधिक आव्हानात्मक होतं. तरीही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दरम्यान आता शस्त्रक्रियेनंतर अनिल कदम यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. केवळ नऊ दिवसांत त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com