Kidney health: सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर समजा किडनी निकामी होतेय; कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला

Morning symptoms kidney: किडनीच्या समस्या ओळखण्यासाठी शरीर काही संकेत देतं. सकाळी सूज, लघवीत बदल किंवा कंबरदुखी यांसारखी लक्षणं दिसत असतील तर दुर्लक्ष करू नका.
Morning symptoms kidney
Morning symptoms kidneysaam tv
Published On

आपल्याला आरोग्यासंबंधी कोणतीही समस्या झाली की, शरीर त्याचे संकेत देत असते. मात्र जवळपास ९९ टक्के लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. किडनीची कोणतीही समस्या असली तर शरीरात काही लक्षणं दिसून येतात. ज्यावेळी किडनीच्या कार्यात कोणताही बिघाड होतो तेव्हा त्याची लक्षणं सकाळच्या वेळी दिसून येतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही या संकेतांकडे लक्ष दिलं, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. जर यावर वेळेत उपचार केले, तर समस्या नियंत्रणात येण्यास मदत होते. ही लक्षणं कोणती आहेत, ती पाहूयात.

सकाळी चेहऱ्यावर सूज दिसणं

जर तुमची किडनी नीट काम करत नसेल, तर समजा शरीरातून अतिरिक्त मीठ आणि पाणी बाहेर पडत नाही. या गोष्टी शरीरात साचू लागतात, तेव्हा सूज येण्याची समस्या निर्माण होते. अशा वेळी चेहऱ्यावर किंवा डोळ्यांभोवती तुम्हाला सूज दिसून येऊ शकते.

Morning symptoms kidney
Breast cancer India: महिलांनो वेळीच सावध व्हा! चुकीच्या सवयींमुळे 30 वयात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

मळमळ होणं

जर तुमच्या किडनीच्या कार्यात कोणताही बिघाड झाला असेल, तर शरीरात युरियासारखे विषारी घटक वाढतात. याला युरेमिया म्हटलं जातं. ज्या वेळी हे घटक तुमच्या पचनसंस्थेत जातात, तेव्हा मळमळ किंवा उलटीसारखी लक्षणं दिसू लागतात.

लघवीत होणारे बदल

जर सकाळी उठल्यावर तुम्ही लघवीला गेलात आणि फेस दिसला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. लघवीमध्ये फेस दिसण्याचा अर्थ तुमच्या शरीरातून प्रोटीन निघून जात असल्याचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्या लघवीचा रंग गडद पिवळा किंवा काहीसा चॉकलेटी दिसत असेल, तर तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

कंबरेचं दुखणं

ज्या व्यक्तींना किडनीचं इन्फेक्शन किंवा किडनीच्या स्टोनचा त्रास असतो, त्यांना कंबरदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. सकाळच्या वेळी हा त्रास जाणवतो आणि रुग्णाची हालचाल मंदावू शकते.

Morning symptoms kidney
Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

त्वचा कोरडी पडणं आणि खाज येणं

ज्या वेळी किडनी योग्य रित्या काम करत नाही, तेव्हा शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर पडत नाहीत. अशा वेळी सकाळच्या वेळी रुग्णाला त्वचा कोरडी पडणं, खाज येणं अशा समस्या जाणवतात.

जर यापैकी एखादे लक्षण दिसल्यास, त्या किडनीच्या समस्या असतीलच असं नाही. मात्र, जर तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणं दिसत असतील, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

Morning symptoms kidney
Bone cancer symptoms: ही लक्षणं दिसली तर समजा हाडांचा कॅन्सर शरीरात करतोय घर, वेळीच डॉक्टरांना दाखवा

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com