

आपण रोजच्या आहारात अनेक गोष्टी खातो. मात्र तुम्हाला माहितीये का की, काही छोटे सिड्स म्हणजे बिया सुद्धा आरोग्यासाठी मोठं काम करू शकतात. विशेषतः शरीरातील वाढलेलं वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी आणि हृदयाची काळजी घेण्यासाठी काही बिया खूप फायदेशीर मानल्या जातात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आहारात काही प्रकारच्या बियांचा समावेश करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक किंवा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका कमी करण्यासाठी संतुलित आहारासोबत या पाच प्रकारच्या बियाण्यांचा आहारात करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. हे हृदयासाठी उपयुक्त फॅट मानलं जातं. याशिवाय अळशीत विरघळणारे फायबर आणि लिग्नॅनही मुबलक असतात. या फायबरला वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) चिकटतं आणि शरीरातून बाहेर टाकण्यास मदत होतं.
अळशीच्या बिया हलक्या भाजून त्याची पूड करून ठेवा. दररोज 1 ते 2 चमचे पूड दही, दलिया किंवा स्मूदीमध्ये मिसळून खाऊ शकता.
चिया सीड्सला सुपरफूड म्हणूनही ओळखलं जातं. यामध्ये फायबर, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे घटक हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. याशिवाय चिया सीड्समध्येही ओमेगा-3 (ALA) आढळतं. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. इतकंच नाही तर चिया सिड्समुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्यातील फायबर शरीरात कोलेस्ट्रॉल शोषलं जाण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत होते.
एक चमचा चिया सीड्स रात्री एक ग्लास पाणी किंवा दुधात भिजत ठेवा. सकाळी तयार झालेला जेल नाश्त्यात किंवा रिकाम्या पोटी खाऊ शकता.
भोपळ्याच्या बियांना पेपिटास असंही म्हणतात. या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि झिंकसारखी महत्त्वाची मिनरल्स भरपूर असतात. मॅग्नेशियममुळे हृदयाचे ठोके नियमित राहण्यास मदत होते. त्याचशिवाय रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. याशिवाय या बियांमध्ये असलेले फायटोस्टेरॉल शरीरात कोलेस्ट्रॉलचं शोषण कमी करण्यास मदत करतात.
भाजलेल्या भोपळ्याच्या बिया स्नॅक म्हणून खाऊ शकता. तसंच सलाड किंवा सूपमध्ये टाकूनही त्यांचा वापर करू शकता.
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर असतं. हे एक प्रभावी अँटिऑक्सिडंट असून रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करतं. व्हिटॅमिन ई शरीरातील पेशींचं नुकसान होण्यापासून संरक्षण करतं. तसंच रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत होऊ शकते. याशिवाय या बियांमध्ये असलेले हेल्दी फॅट्स वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयोगी ठरतात.
या बिया हलक्या भाजून थेट खाऊ शकता. तसंच ओट्स, दही किंवा बेकरी पदार्थांमध्येही त्यांचा वापर करता येतो.
पांढरे आणि काळे दोन्ही प्रकारचे तीळ लिग्नॅन आणि फायटोस्टेरॉलसारख्या घटकांनी समृद्ध असतात. हे घटक शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. काही अभ्यासांनुसार, तिळाचं नियमित सेवन केल्यास वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होण्यास मदत मिळू शकते. तसंच रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकून राहण्यासही फायदा होतो.
तीळ हलके भाजून चटणीत किंवा सलाडमध्ये वापरा. त्याचप्रमाणे स्वयंपाकासाठी तिळाच्या तेलाचाही वापर करू शकता.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.