Kitchen Hacks: कोथिंबीर १५ दिवसांपर्यंत ताजी आणि हिरवीगार ठेवायची? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

Shruti Vilas Kadam

कोथिंबीर धुवून पूर्णपणे कोरडी करा

कोथिंबीर साठवण्यापूर्वी स्वच्छ धुवा आणि कापड किंवा टिश्यूवर पूर्णपणे वाळू द्या. ओलावा राहिल्यास ती लवकर कुजण्याची शक्यता वाढते.

coriander | Freepik

टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा

कोरडी झालेली कोथिंबीर टिश्यू पेपरमध्ये हलक्या हाताने गुंडाळा. टिश्यू अतिरिक्त ओलावा शोषून घेत असल्याने कोथिंबीर जास्त दिवस ताजी राहते.

coriander | Freepik

एअरटाइट डब्यात ठेवा

टिश्यूमध्ये गुंडाळलेली कोथिंबीर एअरटाइट डब्यात किंवा झिप-लॉक पिशवीत ठेवून फ्रिजमध्ये साठवा. त्यामुळे तिचा ताजेपणा टिकून राहतो.

coriander | Freepik

मुळांसह पाण्यात ठेवा

कोथिंबिरीची मुळे असतील तर ती एका ग्लासमध्ये थोडे पाणी भरून उभी ठेवा. वरून हलकी प्लास्टिक पिशवी झाकून फ्रिजमध्ये ठेवल्यास ती अधिक काळ ताजी राहते.

coriander | yandex

खराब पाने काढून टाका

पिवळी किंवा खराब पाने दिसताच ती काढून टाका. खराब पाने इतर ताज्या पानांनाही लवकर खराब करू शकतात.

coriander | Freepik

फ्रिजच्या योग्य भागात ठेवा

कोथिंबीर फ्रिजच्या व्हेजिटेबल क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवा. येथे तापमान आणि आर्द्रता संतुलित असल्याने ती अधिक दिवस ताजी राहते.

Coriander Water

गरजेनुसारच बाहेर काढा

वारंवार संपूर्ण कोथिंबीर बाहेर काढण्याऐवजी जितकी आवश्यक आहे तितकीच वापरा. त्यामुळे उरलेली कोथिंबीर तापमानातील बदलांपासून सुरक्षित राहते आणि जास्त काळ ताजी राहते.

coriander | Freepik

Monsoon Pants for Women: पावसाळ्यात जीन्स नव्हे, 'या' 7 प्रकारच्या पँट्स ठरतील कम्फर्टेबल बेस्ट चॉईस

Monsoon Pants for Women | Saam Tv
येथे क्लिक करा