

स्वयंपाकघरात वापरले जाणारे अनेक मसाले पदार्थांची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही उपयोगी ठरतात. यामध्ये लवंग आणि वेलची आवर्जून उल्लेख केला जातो. दोन्ही मसाल्यांचे वेगवेगळे फायदे आहेत. मात्र त्यांचं योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचन, तोंडाची दुर्गंधी आणि घशाशी संबंधित काही त्रासांमध्ये मदत होऊ शकते.
लवंगमध्ये जंतूंशी लढण्यास मदत करणारे आणि शरीरातील सूज कमी करण्यास हातभार लावणारे गुण आढळतात. त्यामुळे संसर्गापासून बचाव करण्यासाठी ते उपयुक्त ठरू शकते. याशिवाय वेलची पचनास मदत करण्यासोबतच शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला मदत करू शकते. तसंच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही तिचा उपयोग होऊ शकतो.
लवंग आणि वेलची एकत्र चघळल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास, पचन सुधारण्यास आणि ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हे दोन्ही मसाले रोजच्या आहारात योग्य पद्धतीने वापरणं फायदेशीर ठरू शकतं. लवंग आणि वेलची एकत्र खाण्याचे काही फायदे जाणून घेऊया.
लवंग आणि इलायची एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेला फायदा होऊ शकतो. लवंगामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते. तर वेलचीमुळे पोटातील जळजळ आणि अॅसिडिटी कमी होण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे जेवणानंतर पोट जड वाटत असेल किंवा पचनाचा त्रास होत असेल, तर या मसाल्यांचा योग्य प्रमाणात वापर उपयोगी ठरू शकतो.
दिवसभराच्या कामामुळे अनेकदा थकवा आणि आळस जाणवतो. अशावेळी लवंग आणि वेलची चघळल्याने तोंडाला चांगली चव येण्यासोबतच ताजेतवाने वाटू शकते. लवंगचा सुगंध आणि वेलचीचा गोड सुगंध यामुळे फ्रेश वाटण्यास मदत होते.
सर्दी, खोकला किंवा घशात खवखव होत असल्यास लवंग आणि इलायचीचा वापर काही लोक घरगुती उपाय म्हणून करतात. लवंग कफ पातळ होण्यास मदत करू शकते, तर इलायची घशातील खवखव कमी करण्यास मदत करू शकते. हे दोन्ही एकत्र चघळल्याने घशाला आराम मिळण्यासोबतच सर्दी आणि खोकल्याच्या त्रासातही काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
तोंडातून दुर्गंधी येणं अनेकांसाठी लाजिरवाणं ठरू शकतं. अशावेळी लवंग आणि इलायचीचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो. लवंगमध्ये असलेले घटक तोंडातील काही जंतू कमी करण्यास मदत करू शकतात. तर इलायचीचा सुगंध श्वासाला ताजेपणा देतो. त्यामुळे लवंग आणि इलायची चघळल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होण्यास मदत होऊ शकते.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.