

शरीरात कोणताही बिघाड झाला की तुम्हाला लगेच त्याची काही ना काही लक्षणं दिसून येतात. अशातच जर तुम्हाला कोणताही कॅन्सर झाला असेल तर त्याची लक्षणंही तुम्हाला दिसू लागतात. असंच जर तुम्हाला फुफ्फुसांचा कॅन्सर झाला असेल तर त्याची लक्षणं केवळ श्वासांपुरती मर्यादित नसतात. तर त्याची लक्षणं ही तुम्हाला त्वचेवरही दिसून येतात
फुफ्फुसांचा कॅन्सर हा आपल्या श्वसनमार्गातील पेशींमध्ये सुरू होतो. या पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि त्यामुळे कॅन्सर तयार होतो. या कॅन्सरचे दोन मुख्य प्रकार आहेत. हे प्रकार म्हणजे नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर (NSCLC) आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर (SCLC). NSCLC हा सुमारे 85 टक्के रुग्णांमध्ये आढळतो आणि तो तुलनेने हळू वाढतो. याची लक्षणं काय दिसून येतात ती पाहूयात.
काही वेळा कॅन्सरच्या पेशी रक्ताद्वारे शरीराच्या इतर भागात पोहोचचाच. त्यामुळे छाती, पाठ, मान किंवा टाळूवर गाठी तयार होतात. या गाठी साधारणपणे दुखत नाहीत. पण त्या लालसर, निळसर किंवा त्वचेच्या रंगाच्या असू शकतात. काही वेळा त्या फुटून जखमेसारख्या दिसू शकतात. अशा गाठी दिसणं म्हणजे कॅन्सर शरीरात पसरल्याचे संकेत असू शकतात.
काही प्रकारचे लंग कॅन्सर शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अशा ज्यामुळे त्वचेवर अनोख्या प्रकारचे पुरळ किंवा सतत खाज येऊ शकते. याशिवाय डोळ्यांच्या भोवती जांभळट-लाल रंगाचे पुरळ किंवा हातांच्या बोटांवर डाग दिसू शकतात. ही लक्षणं फुफ्पुसांच्या कॅन्सरची मानली जातात.
जर कॅन्सर यकृतापर्यंत पसरला तर पित्तनलिकांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्वचा आणि डोळ्यांचा रंग पिवळसर होतो. याला कावीळ किंवा जॉन्डिस म्हणतात. यासोबत थकवा आणि वजन कमी होणं अशी लक्षणंही दिसू शकतात. हे संकेत अंतर्गत अवयवांवर परिणाम होत असल्याचे दर्शवतात.
जर फुफ्फुसांशी संबंधित समस्या असल्यास बोटांच्या टोकांचा आकार बदलू शकतो. बोटं काहीशी फुगल्यासारखी दिसून येतात आणि नखं खाली वाकलेली वाटतात. याला क्लबिंग म्हणतात. रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे हा बदल होतो.
काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये त्वचेवर जाडसर, मऊ डाग दिसून येतात. याला ट्राइप पाम्स म्हणतात. तसंच मान आणि त्वचेवर काळपट डाग दिसू शकतात. याला अॅकँथोसिस नायग्रिकन्स म्हणतात. हे बदल शरीरात तयार होणाऱ्या विशिष्ट रसायनांमुळे होतात आणि ते लंग कॅन्सरशी संबंधित असू शकतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.