Health Risks: 8 तासांपेक्षा जास्त बसणं सिगारेट ओढण्याइतकंच धोकादायक; या सवयी तुम्हाला करतायत म्हातारं

Everyday Habits That Make You Age Faster: दीर्घकाळ बसून राहणं, अपुरी झोप, ताण आणि जास्त साखर सेवन यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. या सवयी धूम्रपानाइतक्या घातक ठरू शकतात. योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि चांगली जीवनशैली ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
Work Pressure
Work Pressureyandex
Published On

आपण फीट राहावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेकजण विविध प्रयत्नही करतात. जीम, डाएट तसंच योगा करून फीटनेस वाढवण्याचा आपला प्रयत्न असतो. मात्र कामाचे वाढते तास आणि सतत बसून राहण्याची सवय मात्र आपल्याला आजारी पाडतेय. तुम्हाला माहितीये का तुमची ही बसून राहण्याची सवय धुम्रपाना इतकीच घातक आहे.

दीर्घकाळ बसून राहण्याची सवय

आजच्या काळात ऑफिसचं काम असो किंवा मोबाईल-लॅपटॉपचा वापर, अनेकजण दीर्घकाळ एकाच जागी बसून राहतात. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी फार धोकादायक ठरते. अमेरिकेतील संशोधनानुसार, दररोज 8 तासांपेक्षा जास्त वेळ बसून राहणाऱ्या आणि कोणतीही शारीरिक हालचाल न करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं समोर आलं आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा धोका काही प्रमाणात लठ्ठपणा किंवा धूम्रपानाइतकाच गंभीर मानला जातो. मात्र दररोज 60 ते 75 मिनिटं व्यायाम केल्यास हा धोका कमी करता येतो. तासनतास बसून राहिल्याने मेटाबॉलिझम मंदावतं आणि शरीरातील पेशींच्या टेलोमीअर्स जलद गतीने कमी होतात. यामुळे तुमचं अकाली वय वाढल्याचं दिसून येतं.

Work Pressure
Throat cancer: 99 टक्के लोकं या लक्षणांकडे करतात दुर्लक्ष; घशाचा कॅन्सर झाल्यावर शरीर काय संकेत देतं वाचा

अपुरी झोप घेण्याची सवय

अनेकजण त्यांच्या बिझी शेड्युलमुळे 5 तासांची झोप घेतात. मुळात त्यांना ही झोप पुरेशी वाटते. पण ही मोठी चूक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, वयानुसार प्रत्येकाला ठराविक झोपेची गरज असते आणि ती पूर्ण न झाल्यास शरीरावर त्याचे दुष्परिणाम होतात. झोपेमध्ये शरीर स्वतःला दुरुस्त करतं, हार्मोन्सचं संतुलन राखतं. जर सतत तुमची झोप कमी होत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतंय.

सतत तणावात राहण्याची सवय

आजच्या युगात स्ट्रेस दूर ठेवणं कठीण झालं आहे. पण हा ताण जर जास्त वेळ राहिला तर शरीरात कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं. यामुळे तुमच्या त्वचेवर परिणाम होतो. याचबरोबर हृदय, पचनसंस्था आणि मानसिक आरोग्यावरही याचा नकारात्मक परिणाम होतो.

Work Pressure
Heart Disease Risk: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल, तरीही हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टरांनी सांगितला हा दुर्लक्षित घटक ठरतोय विलन

जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूडचं सेवन

आजकाल आपण फास्ट फूड आणि गोड पदार्थांचा जास्त खाऊ लागलोय. मात्र जास्त प्रमाणात साखर घेतल्याने शरीरात ‘ग्लायकेशन’ प्रक्रिया वाढते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर दिसू लागतात.

वयानुसार शरीरातील स्नायू कमी होण्याची प्रक्रिया सुरू होते. जर नियमित व्यायाम विशेषतः स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं नाही तर ही प्रक्रिया आणखी वेगाने वाढते. परिणामी शरीर कमकुवत होतं आणि तुमच्या शरीरातील एनर्जी कमी होऊ लागते.

Work Pressure
Heart Disease Risk: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल, तरीही हार्ट अटॅकचा धोका? डॉक्टरांनी सांगितला हा दुर्लक्षित घटक ठरतोय विलन

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com