ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झालंय? वेळीच करा रिन्यूअल,नाहीतर येईल डोक्याला हात लावण्याची वेळ; जाणून घ्या प्रोसेस

Driving License Renewal Process: मोटार वाहन कायद्यानुसार, ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतरही वाहन चालवणे हा एक गंभीर गुन्हा आहे. अनावश्यक कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी नूतनीकरण प्रक्रिया, वैधतेचे नियम जाणून घ्या.
Driving License Renewal  Process:
DRIVING LICENCE EXPIRED? RENEW IT QUICKLY OR FACE LEGAL TROUBLE AND PENALTIESsaam tv
Published On
Summary
  • एक्सपायर लायसन्ससह वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा.

  • ड्रायव्हिंग लायसन्सचे वेळेत नूतनीकरण आवश्यक.

  • मोटार वाहन कायद्यानुसार दंड आणि कारवाईची तरतूद.

वाहन चालविण्याचा परवाना नसताना कार किंवा इतर कोणतेही वाहन चालवणे हा गुन्हा आहे. जर तुमचा वाहन चालविण्याचा परवाना एक्सपायर झाले असेल आणि तुम्ही तरीही वाहन चालवत असाल, तर तो गंभीर गुन्हा आहे. मोटार वाहन कायद्यानुसार,वाहन चालविण्याचा परवाना फक्त वयाच्या २० किंवा ४० वर्षांपर्यंतच वैध असतो. त्यानंतर, परवान्याची मुदत संपते. मग दर १० वर्षांनी परवान्याचे रिन्यूअल करणे आवश्यक असते. मात्र जर तुम्ही त्याचे नूतनीकरण केले नसेल, तर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Driving License Renewal  Process:
New Toll Rules: केंद्राचा महत्त्वाचा निर्णय! टोल भरला नाही तर वाहन विकता येणार नाही, नियम केले अजूनच कडक

तुमचा परवाना कालबाह्य झाल्यावर काय होते?

कायद्यानुसार, जर तुम्ही कालबाह्य झालेल्या वाहन परवान्यासह पकडले गेलात, तर तो रद्द केला जाऊ शकतो. तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. त्यानंतर तुम्हाला नवीन परवाना मिळवावा लागेल. तुम्हाला पुन्हा वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागू शकते. विहित कालावधीनंतर परवाना आपोआप रद्द होत असतो.

Driving License Renewal  Process:
Farm Land: भोगवटदार वर्ग 2 म्हणजे काय? भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे रुपांतर भोगवटदार वर्ग 1 मध्ये कसे करायचं?

परवाना किती काळ वैध असतो?

मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविण्याचा परवाना वयाच्या २० किंवा ४० वर्षांपर्यंत वैध असतो. वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्यावर परवान्याचा वैधता कालावधी ५ वर्षांपर्यंत कमी होतो. तुमचा परवाना कालबाह्य झाल्यास काळजी करू नका, कारण सरकार नूतनीकरणासाठी ३० दिवसांचा सवलतीचा कालावधी देते. या एका महिन्याच्या कालावधीत तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय तुमच्या परवान्याचे नूतनीकरण करू शकता.

तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाइन कसा नूतनीकरण करायचा?

तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा. ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित सेवा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपले राज्य निवडा आणि आपला वाहन चालविण्याचा परवाना क्रमांक व जन्मतारीख सादर टाका. मग काही तपशील दिसेल.

त्यानंतर नूतनीकरणाचा पर्याय निवडा. मग आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. शुल्क ऑनलाइन भरा आणि सबमिट करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, भरलेल्या रकमेच्या पावतीची आणि अर्जाची एक प्रत डाउनलोड करून सेव्ह करा. तुमच्या वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी, तुम्हाला तुमचा जुना वाहन चालविण्याचा परवाना, आधार कार्ड, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी यांची आवश्यकता असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com