New Toll Rules: केंद्राचा महत्त्वाचा निर्णय! टोल भरला नाही तर वाहन विकता येणार नाही, नियम केले अजूनच कडक

New Toll Rules For Pending Dues: केंद्र सरकारने टोलबाबतचे नियम अजूनच कडक केले आहेत. आता जर तुम्ही टोल चुकवला किंवा भरला नाही तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. तुम्हाला तुमची कार विकता येणार नाही.
New Toll Rules
New Toll RulesSaam Tv
Published On
Summary

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

टोलबाबतच्या नियमात बदल

जोपर्यंत संपूर्ण टोल भरत नाही तोपर्यंत एनओसी मिळणार नाही

वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता टोलच्या नियमात महत्त्वाचे बदल केले आहे. फास्टॅग किंवा यूपीआयद्वारे टोल भरणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता सर्वांना टोल भरावा लागणारच आहे. परंतु कोणी जर टोल चुकवायचा प्रयत्न केला किंवा टोल भरला नाही तर त्यांना फटका बसणार आहे. जर टोलचे पैसे अडकले किंवा कट झाले नाही तर त्याचा संपूर्ण रेकॉर्ड सरकारकडे जमा होणार आहे. यामुळे तुम्हाला फटका बसणार आहे.

New Toll Rules
New Rule: वाहनधारकांनो KYV करा, अन्यथा FASTag होईल बंद

जर तुम्ही टोल चुकवायचा प्रयत्न केला. फास्टॅग स्कॅन झाला पण पैसे जमा झाले नाही तर त्याची सर्व माहिती सरकारकडे जमा होणार आहे. याचाच परिणाम असा की, तुम्हाला नॉन ऑब्जेशन सर्टिफिकेट म्हणजे एनओसी, फिटमेन किंवा परमिट मिळणार नाहीये. तुम्हाला एनओसी मिळणार नाहीये. यामळे त्याचा थेट परिणाम तुमच्या वाहनांच्या कागदपत्रांवर होणार आहे. परिणामी तुम्हाला वाहनांसंबंधित कामांमध्ये अडथळे येतील.

टोलबाबतचे नियम आणखी कडक

देशातील नॅशनल महामार्गावरील टोलबाबत सरकारने नियम अजून कडक केले आहेत. जर कोणी टोल भरला नाही तर त्यांची अनेक कामे होणार नाहीत. त्यांना फिटनेस सर्टिफिकेट, एनओसी मिळणार नाही. यामुळे सरकारी कामांसाठी अडथळे येतील.

सरकारने सेंट्रल मोटर व्हेईकल नियम २०२६ मघध्ये बदल केले आहेत. इलेक्ट्रॉनिक टोल सिस्टीम अजून चांगली होण्यासाठी, टोल चुकवणे थांबण्यासाठी हे नवीन नियम लागू केले आहेत.

New Toll Rules
Toll Plaza: केंद्राचा मोठा निर्णय! आता फक्त FASTag आणि UPIद्वारे भरता येणार टोल; रोख रक्कम पूर्णपणे बंद

वाहन विकता येणार नाही

नवीन नियमांनुसार, जोपर्यंत तुम्ही कारवरील संपूर्ण टोलचे पैसे भरत नाही तोपर्यंत ओनरशिप ट्रान्सफर एनओसी मिळणार नाहीये. याचसोबत दुसऱ्या राज्यात जाण्याचीदेखील परवानगी मिळणार नाहीये. याचसोबत फिटनेस सर्टिफिकेटदेखील रिन्युल होणार नाही. यामुळे तुम्हाला तुमची कार विकता येणार नाही.

New Toll Rules
Toll Plaza: केंद्राचा मोठा निर्णय! आता फक्त FASTag आणि UPIद्वारे भरता येणार टोल; रोख रक्कम पूर्णपणे बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com