Siddhi Hande
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता वाहनधारकांना KYV करणे अनिवार्य केले आहे.
KYV म्हणजे Know Your Vehicle. आता फास्टॅग असलेल्या सर्व वाहनांना ही प्रोसेस बंधनकारक केली आहे.
१ नोव्हेंबर २०२४ पासून KYV चा नियम लागू केला आहे.
जर तुम्ही तुमच्या वाहनांचं KYV केलं नाही तर तुमचा फास्टॅग बंद होऊ शकतो.
KYV साठी वाहनाची नंबर प्लेट आणि फास्टॅग दिसायला हवा असा फोटो आवश्यक आहे.
याचसोबत चालक दिसले पाहिजे असा साइड फोटो आणि वाहनाची आरसी अपलोड करायची आहे.
अनेक ठिकाणी फास्टॅगचा गैरवापर होत आहे. त्यामुळे हे बंधनकारक केले आहे.
KYV मुळे फास्टॅग फक्त एकाच वाहनाशी जोडला जाईल. यामुळे “One Vehicle, One Tag” राबवणे सोपे होणार आहे.
ही प्रक्रिया तुम्हाला तीन वर्षांनी पुन्हा करावी लागणार आहे. जेणेकरुन तुमची माहिती अपडेट राहिल.