Siddhi Hande
अनेकदा आपली एकापेक्षा जास्त अकाउंट असतात. एखाद्या बँकेत अकाउंट आहे हेच आपण अनेकदा विसरुन जातो.
यामुळे त्या अकाउंटमधील रक्कम काय होते, ती तुम्हाला कधी आणि कशी परत मिळणार हे जाणून घ्या.
जर तुमचे खाते १० वर्षांपासून निष्क्रिय असेल तर ही रक्कम ती रक्कम RBI च्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (DEA फंड) मध्ये असू शकते.
ही रक्कम काढण्यासाठी तुम्ही दावा करु शकतात.
सर्वात आधी तुमच्या बँकेच्या कोणत्याही शाखेत जा.
तिथे बँक अकाउंट केवायसी करा. यासाठी (आधार, पासपोर्ट, वोटिंग आयडी आणि ड्रायव्हिंग लायन्स) जमा करा.
यानंतर तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकतात. जर त्यावर व्याज लागू असेल तर तेदेखील तुम्हाला मिळणार आहे.