थंडीच्या दिवसात मॉर्निंग वॉकमुळे कमी होतो हार्ट अटॅकचा धोका? तज्ज्ञांनी दिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर

Heart attack: एका संशोधनानुसार, हृदयविकाराचा झटका हा बहुतेक पहाटे ४ ते १० या वेळेत येण्याचा धोका असतो.
Heart attack Risk In Winter
Heart attack Risk In WinterHealth
Published On

सकाळचं पायी चालणं म्हणजे मॉर्निंग वॉक हा आपल्या शरीराच्या फीटनेससाठी गरजेचा असतो. मात्र जर तुम्ही थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्ही मॉर्निंग वॉकला जायचा विचार करत असाल तर तुमच्या बॉडीचं वॉर्म-अप मात्र नक्की करा. शिवाय यावेळी तुम्ही योग्य ते कपडे परिधान केले पाहिजेत. जेणेकरून थंड वारा तुम्हाला इजा करणार नाही.

एका संशोधनानुसार, हृदयविकाराचा झटका हा बहुतेक पहाटे ४ ते १० या वेळेत येण्याचा धोका असतो. याचं कारण म्हणजे यावेळी एपिनेफ्रिन, नॉरपेनेफ्रिन आणि कोर्टिसोल सारख्या काही हार्मोन्सचा स्राव वाढतो. त्यामुळे ऑक्सिजनची गरज आणि रक्तदाब वाढू शकतो.

Heart attack Risk In Winter
Heart Attack Signs: शरीरात होऊ लागले 'असे' बदल तर वेळीच व्हा सावध; हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात

त्याचप्रमाणे एंडोथेलियल प्रोजेनिटर पेशींच्या पातळीत घट झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता देखील वाढू शकते. थंडीच्या दिवसात सकाळी हृदयविकाराचा धोका आणखी वाढू शकतो. कारण सकाळची थंडी जास्त जोखीम असलेल्या लोकांच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. म्हणजेच ज्यांना उच्च बीपी, मधुमेह किंवा फुफ्फुसाचा त्रास आहे त्यांनी सकाळी विशेष काळजी घेतली पाहिजे. या लोकांनी सकाळचा व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक करणं टाळावं. जर वॉकला जायचं असेल तर योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

Heart attack Risk In Winter
Health News: २६% कमी होईल हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका, झोपण्यापू्र्वी केवळ 'या' सवयी सुधारा

डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजीस्ट डॉ. गजानन गावंडे-पाटील यांनी सांगितलं की, सकाळी शरीर अधिक सक्रिय आणि ताजेतवाने राहतं. त्यामुळे सकाळची वेळ व्यायामासाठी योग्य राहणार आहे. दररोज मॅार्निंग वॅाकला जात असाल तर ते तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते. चालल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.

Heart attack Risk In Winter
महिनाभर चिया सिड्स खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

डॉ. गजानन यांच्या सांगण्यानुसार, दररोज चालल्याने आपली रोगप्रतिकरक शक्ती मजबूत तर होतेच आणि रक्ताभिसरण प्रक्रिया देखील सुरळीत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकारांपासून संरक्षण करण्यास मदत होते. रोज वॉक केल्याने स्ट्रेस लेव्हल कमी होतो, ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं, स्ट्रोकचा धोका कमी होतो, कार्डिओवस्कुलर हेल्थही चांगलं राहतं, झोप चांगली येते, हाडे मजबूत राहतात, लठ्ठपणा दूर होतो आणि डायबिटीसही कंट्रोल राहतो. याउलट शारीरिक हालचाली कमी झाल्यास हृदयविकाराचा झटका यासह इतर अनेक गंभीर आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो

Heart attack Risk In Winter
मेंदूच्या नसा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; चुकूनही दुर्लक्ष करू नका!

थंडीच्या दिवसात मॉर्निंग वॉकवेळी काय काळजी घ्याल?

सकाळी लवकर फिरायला जायचं असेल तर थंडीपासून बचाव होईल याची काळजी घ्या. यावेळी तुमचे हात-पाय झाकून ठेवा. तुमच्या छातीच्या भागाकडे उब असेल याची काळजी घ्या. वॉर्म-अप केल्याशिवाय व्यायाम सुरू करू नका. हिवाळ्यात सकाळी हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. थंड हवामानात दबाव वाढतो आणि परिणामी, आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात आणि अधिक रक्त पंप करणं आवश्यक असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com