Eggs and cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या कोणत्या व्यक्तींनी अंडं खावं पूर्णपणे टाळावं?

Egg yolk cholesterol: अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? अंड्याचा पांढरा भाग आणि पिवळा बलक यातील फरक, उच्च LDL कोलेस्ट्रॉल असताना अंडं खावं का आणि हृदयाच्या आरोग्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबद्दल तज्ज्ञांचं मत जाणून घ्या.
Eggs and cholesterol
Eggs and cholesterolsaam tv
Published On

अंडं हा आपल्यापैकी जवळपास अनेकांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणून अनेक जण नियमित अंडं खातात. मात्र अंडं खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? हा प्रश्नही अनेकांच्या मनात असतो. विशेषतः ज्यांचं कोलेस्ट्रॉल आधीच वाढलेलं आहे किंवा ज्यांना हार्टच्या समस्या आहेत त्यांनी अंडं खावं की टाळावं याबाबत संभ्रम असतो.

आजच्या काळात कोलेस्ट्रॉल वाढणं ही मोठी आरोग्य समस्या आहे. आता कमी वयातही अनेकांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आढळतं. लिपिड प्रोफाइल टेस्ट केल्यानंतर लहान मुलांपासून तरुणांपर्यंत काही जणांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असल्याचं समोर येत आहे.

Eggs and cholesterol
Thigh size: मांडीचा आकार सांगतो तुम्ही किती वर्षे जगणार? नव्या संशोधनातील धक्कादायक खुलासा

एका वेबसाईटला माहिती देताना नवी दिल्लीच्या सी.के. बिड़ला हॉस्पिटलमधील कार्डियक सायन्सेस विभागाचे संचालक डॉ. अंशुल कुमार जैन यांनी सांगितलं की, आजच्या पिढीमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे बदललेली जीवनशैली मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे.

अंड्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं का?

डॉ. अंशुल जैन यांनी अंड्याचे दोन भाग वेगळे समजून घेण्याचा सल्ला दिलाय. अंड्याचा पांढरा भाग म्हणजे एग व्हाइट ज्यामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतं. डॉक्टरांच्या मते बहुतांश रूग्ण अंड्याचा फक्त पांढरा भाग खातात. मात्र अंड्याचा पिवळा भाग म्हणजे एग योक हा फॅट आणि लिपिडने भरलेला असतो. त्यामुळे ज्या व्यक्तींना हार्टच्या समस्या आहे किंवा ज्यांचं कोलेस्ट्रॉल जास्त आहे त्यांनी अंड्याचा पिवळा भाग टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्यामागे काय कारणं?

आजच्या जीवनशैलीत शारीरिक हालचाल कमी झाली आहे. अनेक लोक तासन्तास बसून काम करतात. व्यायामासाठी वेळ दिला जात नाही. त्यातच फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूडचं सेवन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

डॉ. अंशुल जैन यांच्या मते, मागच्या पिढ्यांची जनुकीय रचना मोठ्या प्रमाणात समान असली तरी त्यांची दैनंदिन शारीरिक हालचाल जास्त होती. आज मात्र बसून काम करण्याची सवय, व्यायामाचा अभाव आणि चुकीचा आहार यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतोय.

कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीरावर काय परिणाम होऊ शकतो?

खराब कोलेस्ट्रॉल दीर्घकाळ नियंत्रणात न ठेवल्यास त्याचा परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्यांवर होऊ शकतो. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. याशिवाय पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका देखील वाढू शकतो. या समस्येला Peripheral Artery Disease म्हणजेच पायांच्या धमन्यांमध्ये रक्तप्रवाह कमी होण्याची समस्या असं म्हटलं जातं. गंभीर परिस्थितीत या समस्येमुळे पाय कापण्याची वेळदेखील येऊ शकते.

Eggs and cholesterol
Diabetes: टाईप 1 आणि टाईप 2 डायबेटीज यांच्यात काय आहे फरक? कोणता प्रकार जास्त धोकादायक?

LDL कोलेस्ट्रॉल किती असायला हवं?

डॉक्टरांच्या मते, भारतात हृदयरोगाचं प्रमाण वाढत असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे. Lipid Association of India आणि Cardiological Society of India यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, LDLची योग्य पातळी व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीनुसार वेगवेगळी असू शकते.

  • सामान्य व्यक्तीमध्ये LDL कोलेस्ट्रॉल 100 mg/dL पेक्षा कमी असणं चांगलं मानलं जातं.

  • ज्यांना डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर किंवा कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास आहे, त्यांनी LDL 70 mg/dL पेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

  • याआधी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक झालेल्या व्यक्तींनी LDL 50-55 mg/dL पेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

  • प्रत्येक व्यक्तीची आरोग्यस्थिती वेगळी असल्याने कोलेस्ट्रॉलची लक्ष्य पातळी डॉक्टरांच्या सल्ल्याने ठरवणं योग्य आहे.

Eggs and cholesterol
Thigh length and diabetes: मांडीची लांबी सांगणार टाईप-२ मधुमेहाचा धोका? नव्या अभ्यासातून धक्कादायक संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com