गुरुग्राममधील डॉक्टरांनी एका आफ्रिकन महिलेचा जीव वाचवला आहे. या ठिकाणच्या रूग्णालयातील डॉक्टरांनी 55 वर्षीय आफ्रिकन महिलेच्या पोटातून नऊ किलोग्रॅमपेक्षा जास्त वजनाचा कॅन्सरचा ट्यूमर यशस्वीरित्या काढला आहे.
गुरुग्राममधील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांच्या टीमने तब्बल तीन तासांचं शस्त्रक्रियेनंतर हे यश मिळवलं आहे. अनेक महत्त्वाच्या अवयवांमध्ये अडथळा आणणारा फुटबॉलच्या आकारा इतका ट्यूमर काढण्यासाठी या महिलनेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
आफ्रिकी महिलेवर ही शस्त्रक्रिया करणारे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. अमित जावेद म्हणाले की, या महिलेला ट्यूमरमुळे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. या महिलनेने यापूर्वी आफ्रिकेतील अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेतले होते. परंतु ट्यूमरच्या आकारामुळे आणि तो शरीरात ज्या ठिकाणी होता त्यामुळे जास्त धोका असल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यास नकार देण्यात आला.
डॉ. अमित पुढे म्हणाले की, गुरुग्रामला पोहोचल्यावर सीटी अँजिओग्राफी आणि पीईटी स्कॅनद्वारे संपूर्ण इमेजिंगमध्ये ट्यूमरचा मूत्रमार्गासह महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा दबाव दिसून आला. त्याचा आकार मोठा असल्याने सुरुवातीला या ट्यूमरचं मूळ काहीसं अस्पष्ट होतं.
"ट्यूमरचा आकार 9.1 किलो आणि त्याच्या उत्पत्तीबद्दल अनिश्चितता लक्षात घेता शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. शस्त्रक्रियेनंतर ट्यूमर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल स्ट्रोमल ट्यूमर (GIST) चा असल्याचं आम्हाला कळलं. हा एक दुर्मिळ कॅन्सर आहे जो पोटात उद्भवतो, असंही डॉक्टरांनी सांगितलंय.
या समस्येवर उपचार न केल्यास ट्यूमरमुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते, ज्यात संभाव्य जीवघेणा रक्तस्त्राव देखील होतो. मात्र, डॉक्टरांनी ट्यूमर यशस्वीरित्या काढला असून रुग्ण बरा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.