Vastu Tips : देवघरात ठेवू नका काडीपेटी, अन्यथा...

Vastu tips match box : वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात मॅच बॉक्स ठेवणे चांगले मानले जात नाही.
Vastu Tips
Vastu TipsSaam Tv
Published On: 

Match Box : हिंदू धर्मात सगळेच जण दिवसाची सुरुवात पूजा करून करतात. घरात मंदिर असणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण अशा परिस्थितीत घरातील मंदिराशी संबंधित गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. उदाहरणार्थ, मंदिरात कोणत्या प्रकारची मूर्ती बसवावी, मंदिरात कोणते साहित्य ठेवावे इत्यादी. या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमच्या जीवनात नेहमी आनंद येऊ शकतो.

आयूष्यात प्रगती करण्यासाठी, केवळ कठोर परिश्रम पुरेसे ठरत नाही, त्याला नशिबाची साथ मिळणेही आवश्यक आहे. वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की नशीब घेण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता. यापैकी एक उपाय काडीपेटीशी देखील संबंधित आहे. बरेच लोक आपल्या घरातील (Home) मंदिरात किंवा पूजागृहात काडीपेटीच्या काड्या ठेवतात. त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होतो का? तुम्हाला ते कळतही नसते.

Vastu Tips
Vastu Tips: घरामध्ये कुंडीत चुकूनही लावू नका 'ही' झाडे, अन्यथा...

घरातील मंदिरात काडीपेटी का ठेवू नये ?

वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात (Temple) मॅच बॉक्स ठेवणे चांगले मानले जात नाही. असे केल्याने अनेक प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागतात. खरं तर, आपल्या घरातील सर्वात पवित्र स्थान हे पूजास्थान आहे, जिथे कोणतीही ज्वलनशील वस्तू ठेवू नये. जर एखाद्या व्यक्तीने हे जाणूनबुजून किंवा नकळत केले तर त्याचे नुकसान त्याला सहन करावे लागते.

नकारात्मक शक्ती आकर्षित होऊ लागतात

ज्योतिषांच्या मते, पूजाघरात माचिस ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा (Energy) आकर्षित होतात. या अशुभ शक्ती आपल्या सर्व चालू कार्यात अडथळा आणून शुभ कार्यात विलंब लावतात. या नकारात्मक शक्तींमुळे घरात पैशांची कमतरता भासते आणि डोक्यावर कर्जाचे ओझेही वाढते. असे केल्याने केलेल्या उपासनेचे फळ मिळत नाही.

Vastu Tips
Vastu Tips: घरामध्ये 'या' 5 गोष्टी चुकूनही ठेवू नका, नाहीतर होईल मोठं नुकसान

घरामध्ये या ठिकाणी आगपेटी ठेवावी

वास्तुशास्त्रींच्या मते, घरात माचिस ठेवण्यासाठी बंद जागा किंवा बंद कपाटाचा वापर करावा. असे केल्याने नकारात्मक शक्ती घरापासून दूर राहतात आणि कुटुंबाची प्रगती होते. यामुळे कुटुंबात संपत्तीचा प्रवाह वाढतो आणि मुलांकडून शुभवार्ता प्राप्त होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.