Priya More
वास्तूशास्त्रात सांगितलेल्या अनेक टिप्स ऑपण फॉलो करत असतो. आपल्या आयुष्यासाठी त्या फायदेशीर असतात.
वास्तूशास्त्रात सांगितलेले नियमांचे पालन केलं तर आपले जीवन आणखी सुखी होते असे सांगितले जाते.
वास्तूशास्त्रानुसार या 5 वस्तू आहेत त्या घरात ठेवू नये. नाही तर तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
ताजमहल कधीही घरात ठेवू नये. कारण ही मुमताज बेगमची कबर आहे. त्यामुळे ते घरात ठेवल्याने नकारात्मक शक्तींचा प्रवेश होतो.
महाभारतातील कोणताही फोटो अथवा पुस्तक घरात ठेवू नये. त्यामुळे घरात भांडण, कलहाचे वातावरण निर्माण होते.
सुकलेली फुलं अशुभतेचे लक्षण आहेत. त्यामुळे कुंडीतल्या झाडाला आलेली फुलं अथवा विकत आणलेली फुलं कोमेजल्यानंतर घराबाहेर टाकून द्या.
तुटलेल्या मूर्ती कधीही घरात ठेवू नये. यामुळे घरामध्ये नकारात्मकतेचा प्रभाव वाढतो आणि अशुभता येते.
घरांमध्ये तारा ठेवताना बऱ्याचदा त्याचा गुंता होतो. या अशा गुंता झालेल्या तारा घरामध्ये कधीही ठेवू नका. यामुळे नकारात्मकता निर्माण होते.