Diwali 2025 : जेवणाचा मेन्यू ठरला! फक्त ३० मिनिटांत बनेल स्पेशल थाळी, एकदा ट्राय तर करा 'या' सिंपल रेसिपी

Diwali Special Food Menu : दिवाळीच्या पहिल्या दिवशी स्पेशल जेवण बनवा. झटपट बनवता येतील अशा दोन रेसिपी जाणून घेऊयात. सर्वजण तुमच्या जेवणाचे कौतुक करतील.
Diwali Special Food Menu
Diwali 2025SAAM TV
Published On
Summary

घरगुती फराळामुळे दिवाळीची रंगत वाढते.

दिवाळीला भरपूर मिठाई, ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट्स खाल्ले जातात.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी खास पारंपरिक पदार्थांचा स्वयंपाक बनवा.

दिवाळीला (Diwali 2025) फराळासोबत जेवणाचा मेन्यू देखील स्पेशल असायला पाहिजे. जेणेकरून पुढच्या दिवाळीपर्यंत पदार्थांची चव जिभेवर रेंगाळत राहील. झटपट होणाऱ्या दोन रेसिपी जाणून घेऊयात यात आपण पारंपरिक पदार्थांचा समावेश करणार आहोत. दिवाळी म्हटलं की गोडाचे जेवण आले. म्हणून आपण श्रीखंड पुरी बनवूया. तसेच तिखट जेवणामध्ये सर्वांना आवडणारी झणझणीत पनीर बिर्याणी बनवूया. सिंपल रेसिपी आताच नोट करा.

श्रीखंड पुरी

साहित्य

  • दहीचा चक्का

  • साखर

  • जायफळ

  • केशर

  • ड्रायफ्रूट्स

कृती

श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम छोट्या बाऊलमध्ये केशर, दूध, जायफळ पूड घालून मिक्स करा. त्यानंतर दहीचा चक्का चांगला फेटून घ्या. त्यात गाठी राहणार नाही याची खबरदारी घ्या. मग गॅसवर पॅन ठेवून त्यात साखर आणि पाणी घालून त्याचा चांगला पाक बनवा. नंतर गॅस बंद करून त्यात केशरचे मिश्रण आणि चक्का घालून सर्व एकजीव करा. शेवटी यात तुम्ही ड्रायफ्रूट्स काप टाका. हे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. अशा प्रकारे घरगुती श्रीखंड तयार झाले. दुसरीकडे मैद्याच्या पुऱ्या बनवा.

Diwali Special Food Menu
Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी बनवला कोकणी पदार्थ; चटपटीत 'काजूच्या बोंडूचं भरीत', नोट करा पारंपरिक रेसिपी

पनीर बिर्याणी रेसिपी

साहित्य

  • बासमती तांदूळ

  • पनीर

  • दही

  • कांदे

  • टोमॅटो

  • कोथिंबीर,पुदिना

  • तूप

  • मीठ

  • मसाले (आले-लसूण पेस्ट , हिरवी मिरची, लाल तिखट,हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला)

  • खडे मसाले (तमालपत्र, दालचिनी , लवंगा, वेलदोडे)

कृती

पनीर बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये मीठ घालून शिजवून घ्या. दुसरीकडे एका बाऊलमध्ये १५ -२० मिनिटांसाठी पनीर मॅरिनेट करण्यासाठी ठेवा. त्यात दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, मीठ, कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करा. आता पॅनमध्ये तूप टाकून बारीक चिरलेले कांदे गोल्डन फ्राय करा. त्यात टोमॅटो, खडे मसाले, हिरव्या मिरची टाकून परतून घ्या. त्यानंतर मॅरिनेट केलेले पनीर टाकून ५-७ मिनिटे शिजवा. आता एका मोठ्या भांड्यात तूप टाकून पहिला शिजवलेला बासमती राइस मग पनीर ग्रेव्हीचा थर लावा. असे दोन-तीन वेळा करा आणि १० मिनिटे चांगली शिजवा. शेवटी कोथिंबीर, पुदिना यांनी बिर्याणी सजवा.

Diwali Special Food Menu
Kurdai Recipe : कुरकरीत कुरडई कशी बनवाल? वाचा पारंपरिक रेसिपी, पहिल्याच प्रयत्नात पदार्थ बनेल स्वादिष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com